फोटो सौजन्य - X
रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर भारताचा कर्णधार कोण असा यावर मोठ्या चर्चा रंगल्या. त्यानंतर आज बीसीसीआयचे सिलेक्ट अजित आगरकर यांनी भारतीय संघाचे इंग्लंड दौऱ्यासाठी घोषणा त्याचबरोबर भारतीय संघाचा नवा कर्णधार कोण असणार यासंदर्भात मोठा खुलासा केला आहे. रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर भारतीय संघाचा कर्णधार हा शुभमन गिल असणार आहे यासंदर्भात सांगण्यात आले आहे. रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर लगेचच विराट कोहलीने देखील निवृत्तीची घोषणा सोशल मीडियावरच केली. त्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांची जागा संघामध्ये कोण घेणार या संदर्भात अनेक तर्कवितर्क लावले जात होते.
आज विराट कोहली याचा निवृत्तीवर सिलेक्टर अजित आगरकर यांना प्रश्न विचारण्यात आला यावर त्यांनी स्पष्ट विराटच्या रिटायरमेंटवर केले आहे. टीम इंडियाचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीने १२ मे रोजी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. कोहलीच्या निवृत्तीने सर्वांनाच आश्चर्य वाटले. कोहलीच्या कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीबाबत अजित आगरकर म्हणाले, “विराटने एप्रिलच्या सुरुवातीला आमच्याशी संपर्क साधला आणि सांगितले की त्याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. तो आमच्यासाठी कसोटी क्रिकेटमध्ये एक मोठा खेळाडू होता आणि त्याची जागा घेणे इतके सोपे होणार नाही.”
AJIT AGARKAR ON KOHLI RETIREMENT: “Virat reached out early April & said he had made up his mind”. pic.twitter.com/A02tZXq3Ze — Johns. (@CricCrazyJohns) May 24, 2025
अजित आगरकर म्हणाले की, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी संघातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याने “हा एक मोठा बदल आहे”. इंग्लंडविरुद्धची मालिका एक मोठे आव्हान असेल आणि गिलला स्वतःला सिद्ध करण्यासाठी पुरेशा संधी मिळतील, असेही त्याने सांगितले.
भारताचा संघ इंग्लंड दौऱ्यावर शुभमन गिलचे नेतृत्वात खेळणार आहे. या कसोटी मालिकेमध्ये अनेक नवे चेहरे पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर करूण नायर याला भारतीय संघामध्ये आठ वर्षानंतर पुन्हा एकदा संधी मिळाली आहे. त्याचबरोबर भारतीय संघाचे सलामीवीर फलंदाज कोण असणार हे पाहणे देखील मनोरंजक ठरेल.
शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार/विकेटकिपर), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, करुण नायर, नितीश रेड्डी, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, कृष्णा प्रदीप, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा, आकाशदीप, अर्शदीप सिंह, मोहम्मद सिराज.