Diffrents B/W Womens Cricket vs Mens Cricket
आजपासून women’s cricket world cupला सुरुवात झाली आहे. उद्घाटनाचा सामना भारत महिला विरुद्ध श्रीलंका महिला India women vs Sri lanka women संघामध्ये खेळला जाणार आहे. या निमित्ताने एक प्रश्न समोर येतो – महिला क्रिकेट आणि पुरुष क्रिकेट यामध्ये तफावत का आहे आणि ती कितपत कमी होत आहे?
महिला क्रिकेट अगदी नवीन नाही. सुमारे ३५ ते ३८ वर्षांपासून त्याचे अस्तित्व आहे. पूर्वी हे केवळ आवडीसाठी खेळले जायचे; मात्र गेल्या काही दशकांत आर्थिक दृष्टिकोनाने त्याचे महत्त्व वाढले आहे. आयपीएलसारख्या स्पर्धांमुळे एका १४ वर्षाच्या मुलालाही करोडपती होता येते. महिला क्रिकेटही मागे नाही, पण तरीसुद्धा पैशाच्या बाबतीत मोठी तफावत आहे.
इतिहास आणि परंपरा ही सर्वात मोठी कारणं आहेत. पुरुष क्रिकेटला शंभर वर्षांहून अधिक जुनी परंपरा आहे. प्रतिष्ठित स्पर्धा, प्रतिस्पर्धी संघ आणि सुपरस्टार्स यामुळे ते प्रचंड लोकप्रिय झाले. महिला क्रिकेटला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता खूप उशिरा मिळाल्याने त्यांचा प्रेक्षकवर्ग कमी राहिला आणि लोकप्रियता मिळण्यात अडथळे आले.
Asia cup 2025 : ‘मी शब्दांनी नाही, माझ्या बॅटने उत्तर
आर्थिक गुंतवणूक आणि माध्यम कव्हरेज हेसुद्धा महत्वाचे घटक आहेत. पुरुष क्रिकेटसाठी प्रचंड गुंतवणूक, जाहिरात, प्राइम टाइम स्लॉट आणि प्रायोजकत्व सहज उपलब्ध होतं. परिणामी पुरुष क्रिकेटला प्राधान्य मिळतं, तर महिला क्रिकेटला दुय्यम स्थान दिलं जातं. मात्र, WPL आणि ICC महिला स्पर्धांमुळे हळूहळू परिस्थिती बदलते आहे.
सामाजिक दृष्टिकोन देखील अडथळा ठरतो. बराच काळ क्रिकेट हा पुरुषांचा खेळ मानला जात होता. महिलांना स्वयंपाकघर आणि परंपरांमध्येच मर्यादित पाहिले जात होते. जरी शिक्षणामुळे विचारसरणीत बदल झाला असला तरी ग्रामीण भागात अजूनही रूढी टिकून आहेत. त्यामुळे महिला क्रिकेटला पुरुषांसारखं ग्लॅमर आणि आर्थिक पाठबळ मिळालेलं नाही.
स्पर्धांची संधी यामध्येही फरक आहे. पुरुष क्रिकेटमध्ये वर्षभर विविध मालिका आणि लीग खेळवल्या जातात. त्यामुळे नफा आणि लोकप्रियता दोन्ही वाढतात. महिलांना मात्र तुलनेने कमी स्पर्धा मिळतात.
आशिया कपमधील पराभव जिव्हारी; शोएब अख्तरने व्यक्त केला संताप
तरीही महिला क्रिकेटमध्ये मिताली राज, स्मृती मंधाना, मेग लॅनिंग, एलिस पेरी यांसारख्या दिग्गजांनी आपली छाप पाडली आहे. WPL आणि ICC वर्ल्ड कपला विक्रमी प्रेक्षक मिळाले आहेत. सोशल मीडिया आणि डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे महिला खेळाडूंना थेट चाहत्यांपर्यंत पोहोचता येत आहे.
भविष्यात सातत्यपूर्ण गुंतवणूक, समान संधी आणि योग्य प्रचार मिळाल्यास महिला क्रिकेट पुरुष क्रिकेटइतकंच लोकप्रिय होईल. वाढती लोकप्रियता हेच दाखवते की समान प्रसिद्धी मिळाल्यास प्रेक्षक महिला क्रिकेटलाही नक्कीच उत्स्फूर्तपणे स्वीकारतील.