शुभमन गिल(फोटो-सोशल मीडिया)
Team India Squad for England Tour Announced : अखेर प्रतीक्षा संपली. ज्या क्षणाची वाट सर्व क्रिकेतप्रेमी बघत होते, तो क्षण अखेर आला आहे. बीसीसीआयने इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. आयपीएलनंतर भारताचा संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. यावेळी भारत पाच कसोटी सामन्यांची मालिक खेळणार आहे. बीसीसीआयच्या निवड समितीद्वारे आज १८ सदस्य असलेला भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. भारतीय संघाची धुरा नव्या दमाचा खेळाडू शुभमन गिलच्या खाद्यावर सोपविली आहे. उपकर्णधार म्हणून ऋषभ पंतची निवड करण्यात आली आहे.
बीसीसीआयने नुकतीच इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. बीसीसीआयने शुभमन गिलवर विश्वास दाखवत या युवा खेळाडूवर कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली आहे. शुभमन गिलने २०२० मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्न येथे कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होतं. शुभमन गिलने आतापर्यंत २५ कसोटी सामने खेळले आहेत. याकाळात त्याने १४९७ धावा केल्या आहेत. तसेच त्याने ५ शतके आणि ७ अर्धशतके झळकावली आहेत.
बीसीसीआयकडून इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. करुण नायर तब्बल ८ वर्षांनी भारताच्या रेड बॉल संघात परतला आहे. करुण नायरने २०१६ मध्ये भारतासाठी कसोटी पदार्पण केले होते. त्यानंतर, त्याने चेन्नईच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध ३०३ धावांची नाबाद खेळी खेळून कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकावण्याचा भीम पराक्रम केला होता. त्यानंतर तो आपला फॉर्म टिकवू शकला नाही. त्यानंतर २०१७ मध्ये त्याला टीम इंडियामधून डच्चू देण्यात आला होता. आता मात्र त्याला पुन्हा संधी देण्यात आली आहे.
Shubman Gill-led #TeamIndia are READY for an action-packed Test series 💪
A look at the squad for India Men’s Tour of England 🙌#ENGvIND | @ShubmanGill pic.twitter.com/y2cnQoWIpq
— BCCI (@BCCI) May 24, 2025
२० जूनपासून भारत आणि इंग्लंड संघात ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. यापैकी पहिली कसोटी 20-24 जून (लॉर्ड्स), दुसरा कसोटी सामना २ ते ६ जुलै (बर्मिंगहॅम), तिसरा कसोटी सामना 10 ते 14 जुलै (लॉर्ड्स), चौथा कसोटी सामना 23 ते 27 जुलै (मँचेस्टर) आणि पाचवा कसोटी सामना 31 जुलै ते 4 ऑगस्टदरम्यान (ओव्हल, लंडन) खेळवला जाणार आहे.