अनाया बांगर (फोटो-सोशल मीडिया)
Anaya Bangar gave information about her health : भारतीय संघाचे माजी फलंदाजी प्रशिक्षक आणि माजी क्रिकेटपटू संजय बांगर यांची मुलगी अनाया बांगर सद्या खूप चर्चेत असल्याचे दिसून येत आहे. ती सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते ती तिच्या दैनंदिन आयुष्याबाबत माहिती देत असते. अनया आधी मुलगा होती. नंतर ती जेंडर चेंज ऑपरेशन करून मुलगी बनली आहे. आता अनायाने अलीकडेच तिची ओळख परत मिळवण्यासाठी शस्त्रक्रिया करून घेतली आहे. ती सध्या त्यातून बरी होत आहे. शस्त्रक्रियेनंतर अनयाने तिच्या चाहत्यांना एक खुशखबर दिली आहे. चाहत्यांना तिने दिलेली बातमी ऐकून मोठा सुखद धक्का बसला आहे. अनायाने तिच्या इंस्टाग्राम पेजवर एक पोस्ट करून ही माहिती दिली आहे. यासोबत एका माहितीसह तिने आपल्या चाहत्यांचे आभार देखील मानले आहेत.
अनाया बांगरकडून तिच्या इंस्टाग्राम पेजवर एक पोस्ट करण्यात आली आहे. यामध्ये तिने लिहिले आहे कि, “शस्त्रक्रियेनंतर माझी प्रकृती खूप चांगली आहे. मला पाठिंबा दिल्याबद्दल सर्वांचे आभार. जे माझा द्वेष करत असतात, त्यांचे देखील आभार.” तसेच तिने हे देखील सांगितले की तिच्या शस्त्रक्रियेवर एक डॉक्यूमेंट्रीहि बनवली गेली आहे. जी लवकरच प्रदर्शित करण्यात येणार आहे. ही डॉक्यूमेंट्री लवकरच तिच्या यूट्यूब चॅनलवर लाँच होणार असल्याची माहिती आहे.
या डॉक्यूमेंट्रीमध्ये अनाया बांगरने आपली ओळख कशी मिळवली आहे याबाबत माहिती दिली आहे. काही दिवसांपूर्वी संजय बांगर यांच्या मुलीने इंस्टाग्रामवर एक पोस्ट करत लिहिले होते कि, “माझ्या ओळखीच्या दिशेने आणखी एक पाऊल जवळ”. असं तिने नोंदवले होते.
काही दिवसांपूर्वी, अनायाकडून तिच्या शस्त्रक्रियेपूर्वीचा एक व्हिडिओ यूट्यूब चॅनलवर शेअर करण्यात आला होता. 7 मिनिटांच्या त्या व्हिडिओमध्ये अनायाने तिच्या शरीराच्या कोणत्या भागांवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती याची माहिती दिली होती. आतापर्यंतच्या तिच्या परिवर्तनाच्या प्रवासाची आठवण करून ती भावनिक देखील झाल्याचे दिसून आले होते.
हेही वाचा : केएल राहुलने सईद अन्वर आणि वीरेंद्र सेहवागला टाकलं मागे! सुनील गावस्कर यांच्याशी जोडलं नाव
2 जुलै रोजी, अनाया बांगरची ब्रेस्ट ऑग्मेंटेशन आणि ट्रेकियल शेव सर्ज शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली होती. यामध्ये, ब्रेस्ट ऑग्मेंटेशनमुळे तिच्या शारीरिक परिवर्तन प्रक्रियेला आणखी खूप पुढे नेण्यास मदत केली होती. अनाया बांगरने सांगितले आहे कि, तिने टाकलेली ही पावले तिच्या लिंग बदलाच्या प्रवासाचा एक महत्त्वाचा भाग आहेत. अनया ती लहान असताना तिला क्रिकेटपटू आर्यन बांगर म्हणून ओळखले जात होते.