फोटो सौजन्य -
भारताचा स्टार युवा क्रिकेटर शुभमन गिल आता आगामी मालिका भारत विरुद्ध बांग्लादेश यामध्ये खेळताना दिसणार आहे. यामध्ये त्याला संघामध्ये स्थान मिळाले आहे. दोन दिवसांपूर्वी बांग्लादेशविरुद्ध होणाऱ्या मालिकेसाठी भारताच्या कसोटी संघाची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये अनेक नव्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. भारतीय क्रिकेटर शुभमन गिलने 8 सप्टेंबर रोजी त्याचा 25 वा वाढदिवस साजरा केला. त्याच्या वाढदिवसाच्या पार्टीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. भारतीय क्रिकेटपटू अनेकदा अभिनेत्रींसोबतच्या संबंधांच्या बातम्यांनी वेढले गेले आहेत आणि शुभमन गिल देखील अशाच अफवांनी वेढले गेले आहेत.
आता सोशल मीडियावर शुभमन गिल यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा सुरु आहेत. क्रिकेटर शुभमन गिल यांचे नाव आता बॉलीवूड अभिनेत्री आणि सोशल मीडिया स्टार अवनीत कौरसोबत रिलेशनशिपमध्ये आहे अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. खरं सांगायचं झालं तर गिलच्या वाढदिवसानिमित्त अवनीत कौरने तिच्या इंस्टाग्रामवर एक स्टोरी अपडेट केली, ज्यामध्ये गिल आणि अवनीत एकत्र दिसत आहेत. अवनीतने हा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, “शुभमन, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. लोकांना असेच प्रेरणा देत राहा. मला तुझा खूप अभिमान आहे.”
सोशल मीडियावर बऱ्याच वर्षांपासून शुभमन गिल आणि भारताचा माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकर यांची मुलगी सारा तेंडुलकरसोबत नाव जोडले जात होते. पण आता त्यांच्यात काही नाते होते, ते संपले आहे. पण याआधी शुभमन गिल आणि अवनीत कौर यांना अनेक प्रसंगी एकत्र पाहिलं गेलं आहे, यावरून त्यांच्या नात्याची बातमी पक्की असल्याचं कळतं. डिसेंबर २०२३ मध्ये शुभमन गिल आणि अवनीत कौर लंडनमध्ये फिरताना दिसले होते. त्याच वेळी, अवनीतच्या इंस्टाग्रामवरील शुभमनचे फोटो देखील त्यांच्या डेटिंगच्या अफवांना वाव देत आहेत. या संदर्भात गिल आणि अवनीत यांच्याकडून कोणतीही पुष्टी झालेली नाही, परंतु त्यांच्या नात्याची बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरत आहे.