बेन स्टोक्स आणि पॅट कमिन्स(फोटो-सोशल मीडिया)
Ashes 2025 : नुकतीच भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात आली. ही मालिका २-२ अशी बरोबरीत सुटली आहे.या मालिकेत दोन्ही संघांनी शानदार कामगिरी केली आहे. ही मालिका टीम इंडियाची आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप २०२५-२०२७ या सायकलमधील पहिलीच मालिका होती. भारताने युवा कर्णधार शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील खेळवण्यात आलेल्या पहिल्या मालिकेत भारतीय खेळाडूंनी शानदार कामगिरी केली आहे. आता भारतीय संघाचे आशिया कप २०२५ या स्पर्धेकडे लक्ष्य असणार आहे. तसेच इंग्लड संघ देखील नोव्हेंबरमध्ये खेळवण्यात येणाऱ्या आस्ट्रेलियाविरुद्धच्या एशेस मालिका खेळणार आहे.
इंग्लंड दौऱ्यानंतर भारतीय संघ आता आशिया कप २०२५ स्पर्धेची जय्यत तयारी करताना दिसत आहे. आशिया कप २०२५ स्पर्धेला ९ सप्टेंबरपासून सुरवात होणार आहे. ही स्पर्धा २८ सप्टेंबरपर्यंत खेळवली जाणार आहे. त्यांनतर भारतीय संघ मायदेशातील पहिली तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप २०२५-२०२७ या सायकलमधील एकूण दुसरी मालिका विंडीज विरुद्ध खेळवली जाणार आहे. भारत विरुद्ध विंडीज विरुद्ध यांच्यात एकूण २ कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. तर दुसऱ्या बाजूला इंग्लंड टीम इंडियानंतर आता थेट नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या कसोटी मालिका खेळणार आहे.
हेही वाचा : सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय! BCA च्या लोकपालपदी न्यायमूर्ती नागेश्वर राव यांची नियुक्ती
इंग्लंडसाठी ही मालिका फार प्रतिष्ठेची अशी असणार आहे. प्रतिष्ठेच्या एशेस सीरिजनिमित्ताने इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया आमनेसामने येणार आहेत. उभयसंघात एकूण ५ कसोटी सामने खेळवण्यात येणार आहेत. उभयसंघात नोव्हेंबर ते ८ जानेवारी दरम्यान या मालिकेचा थरार रंगणार आहे. इंग्लंड या मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौरा करणार आहे. त्यामुळे इंग्लंडसाठी हा दौरा आव्हानात्मक असणार आहे.
या मालिकेला अजून बराच कालावधी शिल्लक आहे. मात्र आतापासूनच या मालिकेसाठी वातावरण निर्मिती केली जात आहे. पॅट कमिन्स हा या मालिकेत ऑस्ट्रेलियाच्या संघाचे नेतृत्व करणार आहे. तर बेन स्टोक्स हा इंग्लंडच्या कर्णधारपदाची जबाबदारी पेलणारा आहे.
हेही वाचा : IPL 2026 : झहीर खान LSG ला करणार राम राम! ‘या’ दोन पदांसाठी गोएंकाकडून नवीन चेहऱ्यांची शोधाशोध
एशेस सीरिजमध्ये इंग्लंडसमोर एक मोठं आव्हान असणार आहे. मागील १० वर्षांपासूनची पराभवाची जी मालिका सुरु आहे. ती खंडीत करण्यासाठी इंग्लंड संघाला मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करावे लागणार आहे. इंग्लंडने २०१५ साली शेवटची एशेस मालिका जिंकण्यात यशस्वी ठरला होता. इंग्लंडला त्यानंतर झालेल्या ४ पैकी २ मालिकांमध्ये पराभूत व्हावं लागलं. तर इंग्लंडने २ मालिकेत बरोबरीत साधली होती. मात्र यंदा ऑस्ट्रेलियात ही मालिका होणार असल्याने इंग्लंडला विजय मिळवणं आव्हानात्मक असणार आहे.