झहीर खान(फोटो-सोशल मीडिया)
IPL 2026 : आयपीएल संदर्भात मोठी बातमी समोर येत आहे. भारतीय संघाचा माजी अनुभवी गोलंदाज आणि लखनऊ सुपर जायंट्सचा मेंटर असलेल्या झहीर खानचा एक वर्षाचा करार जवळजवळ संपल्यात जमा आहे. करार संपल्यानंतर, लखनऊ सुपर जायंट्स झहीर खानचा कार्यकाळ वाढवणार नसल्याची माहिती मिळत आहे. एलएसजी आता झहीर खानला दूर ठेवण्याच्या इराद्यात आहे.
टाईम्स ऑफ इंडियामधील वृत्तानुसार, लखनऊ सुपर जायंट्स आता नवीन मेंटरच्या शोधात आहे. एलएसजीचा नवीन मेंटर केवळ आयपीएल संघासाठीच काम बघणार नाही तर दक्षिण आफ्रिकेच्या एसए२० लीगमधील डर्बन सुपर जायंट्स आणि इंग्लंडच्या द हंड्रेड लीगमधील मँचेस्टर ओरिजिनल्ससारख्या संघाच्या इतर लीगमधील संघांसाठी देखील काम करताना दिसणार आहे.
हेही वाचा : Asia cup 2025 : जसप्रीत बुमराह की शाहीन आफ्रिदी कोण आहे वरचढ? आशिया कपमध्ये कोणाची आहे चलती? वाचा सविस्तर..
अहवालात असे देखील म्हटले आहे की, एलएसजी गट पूर्ण वर्षाच्या विकासासाठी क्रिकेट संचालकाची घोषणा देखील करणार आहे. २०२३ मध्ये कोलकाता नाईट रायडर्समध्ये गेल्यानंतर झहीरने गौतम गंभीरची जागा घेतली होती. मोर्ने मॉर्केल गेल्यापासून झहीर खान गोलंदाजी प्रशिक्षकाची भूमिका देखील बजावत होता. मोर्ने मॉर्केलला भारतीय संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक बनवण्यात आल्यानंतर त्याने एलएसजीला सोडचिठ्ठी दिली होती.
एलएसजीने नुकतीच भारताचे माजी आणि केकेआर गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांना त्यांच्या कोचिंग स्टाफमध्ये सहभागी करून घेतले आहे. सूत्रानुसार, भरत अरुण यांच्या खांद्यावर देखील मोठी जबाबदारी दिली गेली आहे. त्यांच्याकडे या परदेशी संघांमधील तरुण वेगवान गोलंदाजांना शोधण्याचे आणि प्रशिक्षण देण्याचे काम अपवण्यात आल्याची माहिती आहे. एलएसजीचा आयपीएल २०२५ चा हंगाम खूपच निराशाजनक राहिला असून संघ १४ पैकी सहा सामन्यांमध्ये विजय मिळवून सातव्या स्थानावर राहिला होता.
हेही वाचा : Asia Cup 2025 : आशिया कपआधी टीम इंडियाच्या अडचणीत वाढ! स्टार खेळाडू दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
जस्टिन लँगरच्या नेतृत्वाखालील कोचिंग स्टाफमध्ये सहभागी झालेले भरत अरुण यांनी एका निवेदनाद्वारे म्हटले आहे होते की त्यांचे ध्येय हे एलएसजीला ‘एकसंध आणि धोरणात्मकदृष्ट्या तीक्ष्ण’ संघ बनवण्यात मदत करणे. अरुण पुढे म्हणाले की, “लखनौ सुपर जायंट्समध्ये सामील होणे माझ्यासाठी मोठ्या सन्मानाची गोष्ट आहे, ही एक व्यावसायिक, महत्त्वाकांक्षी आणि प्रत्येक स्तरावर दूरदृष्टी असलेली फ्रँचायझी आहे.