झिम्बाब्वे संघाचा कर्णधार सिकंदर रझा(फोटो-सोशल मीडिया)
Captain Raza’s statement regarding the World Cup : टी-२० विश्वचषकाला काही दिवस बाकी असताना सर्वच संघ या मोठ्या स्पर्धेसाठी चांगलेच तयारीला लागले आहे. अनेक संघांनी आपापले संघ देखील जाहीर केले आहेत. दरम्यान, काही काळापासून संघर्ष करत असलेला झिम्बाब्वे संघ येत्या टी-२० विश्वचषकात दमदार कामगिरी करून जागतिक क्रिकेटमध्ये आपले अस्तित्व पुन्हा स्थापित करू शकेल, असा विश्वास झिम्बाब्वे संघाचा कर्णधार सिकंदर रझाने व्यक्त केला आहे. ७ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेत माजी विजेत्या ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यासोबत झिम्बाब्वेला गट ब मध्ये स्थान देण्यात आले आहे, तर आयर्लंड आणि ओमान देखील त्याच गटात आहेत.
टी-२० विश्वचषका
रविवारच्या पार्ल रॉयल्स आणि एमआय केपटाऊन यांच्यातील सामन्यानंतर एसए २० ने आयोजित केलेल्या संभाषणात रझा म्हणाला, विश्वचषक प्रत्येक क्रिकेटपटूच्या आयुष्यात महत्त्वाचा असतो. मला नेहमीच असे वाटते की जागतिक क्रिकेटमध्ये झिम्बाब्वेला अधिक आदर मिळवून देण्यात विश्वचषक महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. एमआय केपटाऊनवर सात विकेटने विजय मिळवताना रझा यांनी रॉयल्ससाठी चार विकेट घेतल्या. आम्हाला ताठ मानेने परतता येईल आणि आमच्या देशवासियांना अभिमान वाटेल, अशी कामगिरी करायची आहे. आम्हाला निकालांची जास्त काळजी नाही.
विश्वचषकापूर्वी एसए२० आणि आयएलटी २० मध्ये खेळल्याने त्याच्या खेळाडूंना खूप मदत होईल. आपण जितके जास्त खेळू शकतो तितके चांगले. आयएलटी२० मध्ये झिम्बाब्वेचे तीन क्रिकेटपटू देखील सहभागी होतात. रझा त्याचा धाकटा भाऊ मोहम्मद महिदीच्या अकाली निधनानंतर येथे खेळण्यासाठी आला आहे. एसए २० मध्ये खेळणारा झिम्बाब्वेचा पहिला क्रिकेटपटू रझा म्हणाला, माझ्या आयुष्याचा तो भाग नेहमीच कठीण असेल, पण मी मानसिक, शारीरिक आणि भावनिकदृष्ट्या तयार नसतो तर मी इथे आलो नसतो. मला वाटले की मी योगदान देऊ शकतो, म्हणून मी इथे आलो.
हेही वाचा : मुस्तफिजूर रहमान IPL वाद! कोणाच्या आदेशावरून बांगलादेशच्या गोलंदाजाला दाखवला बाहेरचा रस्ता
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांच्या अॅशेस कसोटी मालिकेतील पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात, ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज स्टीव्ह स्मिथने इतिहास रचला आहे. पाचव्या कसोटीत इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या डावात शतक झळकावून स्मिथने भारताचा माजी कर्णधार दिग्गज राहुल द्रविडचा विक्रम मोडला आहे. इंग्लंडविरुद्धच्या या शतकासह, स्टीव्ह स्मिथच्या कसोटी कारकिर्दीत आता ३७ शतके जमा झाली असून स्मिथने या बाबतीत राहुल द्रविडला मागे टाकले आहे. राहुल द्रविडने त्याच्या खेळण्याच्या काळात एकूण ३६ शतके ठोकली आहेत. द्रविडने १६४ कसोटी सामने खेळले असून यामध्ये त्याने ३६ वेळा १०० धावांचा टप्पा पार केला आहे. तर स्मिथने त्याच्या १२३ व्या कसोटी सामन्यात शतक ठोकून राहुल द्रविडला पिछाडीवर टाकले.






