अभिषेक शर्मा(फोटो-सोशल मीडिया)
भारतीय क्रिकेट संघाचा स्फोटक सलामीवीर अभिषेक शर्माने बांगलादेशविरुद्ध अर्धशतक झळकवले आहे. अभिषेक शर्मा आपल्या प्रत्येक टी-२० सामन्यात एक नवा विक्रम स्थापन करताना दिसत आहे. मागील सामन्यात पाकिस्तानविरुद्ध अभिषेक शर्माने सर्वात जलद अर्धशतक झळकावून युवराज सिंगचा विक्रम मोडीत काढला आहे. त्यानंतर अभिषेक शर्माने आता बांगलादेशविरुद्ध युवराजचा आणखी एक विक्रम मोडला आहे.
आशिया कप च्या सुपर फोर सामन्यात बंगालदेशविरुद्ध अभिषेक शर्माने फक्त २५ चेंडूत अर्धशतक झळकावले आहे. अभिषेकने टी-२० मध्ये २५ चेंडू किंवा त्यापेक्षा कमी वेळेत अर्धशतक झळकावण्याची ही पाचवी वेळ ठरली आहे. त्याने या विक्रमात युवराज सिंगला पिछाडीवर सोडले आहे. युवराज सिंगने टी-२० मध्ये चार वेळा २५ चेंडू किंवा त्यापेक्षा कमी वेळेत अर्धशतके झळकवण्याची किमया साधली होती.
भारताकडून सर्वाधिक अर्धशतके झळकावणाऱ्यांच्या यादीमध्ये सूर्यकुमार यादवने २५ चेंडू किंवा त्यापेक्षा कमी वेळेत सात अर्धशतके झळकाववण्याचा कारनामा केला आहे. यादीत माजी कर्णधार रोहित शर्मा दुसऱ्या स्थानावर विराजमान आहे, त्याने सहा वेळा ही कामगिरी केली आहे. अभिषेक शर्मा या यादीमध्ये तिसऱ्या स्थानावर आला आहे. अर्धशतके आणि शतके एकत्र करून हे आकडे मोजण्यात येतात.
हेही वाचा : Shreyas Iyer चा रेड बॉल क्रिकेटमधून ब्रेक! BCCI ने सोडले मौन, केला मोठा खुलासा…
अभिषेक शर्माने आशिया कप सुपर ४ सामन्यात बांगलादेशविरुद्ध ३७ चेंडूत ७५ धावा फटकावल्या आहेत. या खेळीत त्याने ५ षटकार आणि ६ चौकार मारले आहेत. या सामन्यात तो निराशाजनकपणे तो धावबाद झाला अन्यथा त्याचा शतकाकडे प्रवास झाला आहे.






