शाहीन आफ्रिदी आणि जसप्रीत बुमराह(फोटो-सोशल मीडिया)
Asia cup 2025 : भारतीय संघ नुकताच इंग्लंड दौरा संपवून परतला आहे. भारताने तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीमधील पाच कसोटी सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाने शानदार कामगिरी केली. शेवटच्या आणि पाचव्या कसोटी सामन्यात भारताने इंग्लंडचा ६ धावांनी पराभव करून मालिका २-२ अशी बरोबरीत सोडवला. या मालिकेत भारतीय फलंदाजी बरोबर गोलंदाजी देखील शानदार राहिली आहे. आता भारतीय संघाचे संपूर्ण लक्ष्य आशिया कप २०२५ स्पर्धेकडे लागले आहे. या स्पर्धेत क्रिकेट प्रेमींना हायहोल्टेज सामना बघायला मिळणार आहे. या स्पर्धेत १४ सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्धी आमनेसामने येणार आहेत. या दरम्यान भारतीय स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी यांच्यात थेट सामना बघायला मिळेल. आशिया कपच्या इतिहसातच कोणाची आकडेवारी जबरदस्त आहे ते आपण बघूया.
हेही वाचा : PHOTOS: आशिया कपच्या इतिहासात INDIA vs PAk मधील ‘हे’ पाच सामने राहिले थरारक; जाणून घ्या कोण ठरले वरचढ
आशिया कप २०२५ स्पर्धेला ९ पासून सुरवात होत आहे. ही स्पर्धा २८ सप्टेंबरपर्यंत खेळवली जाणार आहे. यावेळी आशिया कपचे आयोजन संयुक्त अरब अमिराती मध्ये करण्यात आले असून या स्पर्धेचे स्वरूप टी २० स्वरूपाचे असणार आहे. सुरुवातीच्या वेळापत्रकानुसार, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील गट टप्प्यातील सामना १४ सप्टेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाणार आहे. आशिया कप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान १९ वेळा आमने सामने आले आहेत. यामध्ये भारला १० वेळा तर पाकिस्तान ६ वेळा विजय मिळला आहे. तर ३ सामन्यांचा निकाल लागू शकला नाही.
आशिया कप २०२५ स्पर्धेत यावेळी चाहत्यांच्या नजरा भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि पाकिस्तानी गोलंदाज शाहीन आफ्रिदी या गोलंदाजानावर असणार आहेत. दोघांचीही गणना आधुनिक काळातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांमध्ये केली जाते. दोन्ही वेगवान गोलंदाज आपापल्या संघासाठी चांगली कामगिरी करताना दिसत आहे. पाकिस्तानच्या शाहीन आफ्रिदीची तूलना अनेक दिग्गजांनी बुमराहसोबत केली आहे. परंतु अलिकडच्या काळात, भारतीय गोलंदाज बुमराहने अनेक यशाचे शिखर गाठले आहेत. तर दुसरीकडे शाहीन त्याच्या फॉर्मशी झुंजत असल्याचे दिसत आहे. भारत आणि पाकिस्तान फक्त आयसीसी किंवा आशिया कपमध्ये एकमेकांच्या आमनेसामने येतात. यावेळी आशिया कपमध्ये जसप्रीत बुमराह आणि शाहीन आफ्रिदी अशी जुगलबंदी अनुभवायला मिळणार आहे.
आपण बुमराह आणि शाहीनच्या टी-२० रेकॉर्डबद्दल बोलायचं झाल तर शाहीनने ८१ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १०४ बळी टिपले आहेत. त्याने दोनदा चार बळी घेण्याची कामगिरी केली आहे. या दरम्यान त्याची सरासरी २२.२५ आहे तर सर्वोत्तम कामगिरी २२ धावांत ४ बळी अशी राहिली आहे. तर जसप्रीत बुमराहबद्दल सांगायचं झालं तर, त्याने भारतासाठी ७० टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने ८९ बळी मिळवले आहेत. त्याची सर्वोत्तम कामगिरी ७ धावांत ३ बळी ही राहिली आहे.
जसप्रीत बुमराहने आशिया कपमध्ये भारतासाठी टी-२० स्वरूपात ५ सामन्यांमध्ये ६ विकेट्स घेतल्या आहेत. तर शाहीनने अद्याप या स्वरूपात एक देखील सामना खेळलेला नाही. तथापि, दोघांनीही आशिया कपच्या एकदिवसीय स्वरूपात बळी घेतलेले आहेत. आशिया कपच्या एकदिवसीय स्वरूपात, शाहीनने ८ सामन्यांमध्ये १४ बळी मिळवले आहेत. तर जसप्रीत बुमराहने ८ सामने खेळून १२ बळी घेतले आहेत.
हेही वाचा : रशीद खानच्या नावे लाजिरवाणा विक्रम! द हंड्रेडच्या इतिहासात ठरला पहिलाच गोलंदाज