जसप्रीत बुमराह(फोटो-सोशल मीडिया)
Jasprit Bumrah has a chance to set a record in the first T20I match : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांची टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेचा पहिला सामना ९ डिसेंबर रोजी कटकमधील बाराबती स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला एका मोठ्या कामगिरीची संधी असणार आहे. तो टी-२० क्रिकेटमध्ये शतक ठोकण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : हार्दिक पांड्याने पपाराझींना धरलं धारेवर, गर्लफ्रेंडचा घाणरेडा व्हिडिओ काढल्यामुळे संतापला! पहा Post
तो टी-२० क्रिकेटमध्ये १०० वा बळी टिपण्यापासून फक्त एक विकेटच दूर आहे. या सामन्यात एक विकेट घेताच तो हा खास टप्पा गाठेल. आतापर्यंत बुमराहने भारतासाठी ८० टी-२० सामन्यांच्या ७७ डावांमध्ये ९९ विकेट घेण्याची किमया साधली आहे. कटक टी-२० मध्ये आणखी एका विकेटसह तो १०० विकेटचा टप्पा गाठेल.
भारतासाठी फक्त अर्शदीप सिंग या एकमेव गोलंदाजाने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० बळींचा टप्पा पार केलेला आहे. तो हा टप्पा गाठणारा सर्वात जलद गोलंदाज देखील ठरला आहे. अर्शदीप सिंगने ६८ सामन्यांमध्ये १०५ बळी घेतले आहेत. या यादीत जसप्रीत बुमराह दुसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे. यानंतर हार्दिक पंड्या तिसऱ्या क्रमांकावर येतो. पंड्याने भारतासाठी टी-२० मध्ये ९८ बळी टिपले आहेत.
युजवेंद्र चहल हा टी-२० स्वरूपात भारताचा चौथा सर्वात यशस्वी गोलंदाज असून त्याने ८० सामन्यांमध्ये ९६ बळी मिळवले आहेत. २०२३ पासून तो एकही टी-२० आंतरराष्ट्रीय खेळलेला नाही. भुवनेश्वर कुमार हा टी-२० मध्ये भारताचा पाचवा सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. ज्याने ८७ सामन्यांमध्ये ९० बळी घेण्याची किमया साधली आहे. भुवनेश्वर कुमारने २०२२ पासून एक देखील टी-२० सामना खेळलेला नाही.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात कटकमध्ये होणारा पहिला टी-२० सामना होणार आहे. या सामन्यात खूप रोमांचक वळण बघायला मिळणार अशी चाहत्यांना अपेक्षा आहे. दक्षिण आफ्रिकेने कसोटी मालिका जिंकली त्यानंतर भारताने एकदिवसीय मालिकेत विजय मिळवला आहे. त्यामुळे, आता दक्षिण आफ्रिका टी-२० मालिकेत भारतीय संघाला चांगली टक्कर देण्यासाठी सज्ज आहे.






