फोटो सौजन्य - सोशल मिडिया
स्टीव्ह स्मिथ, अॅशेसमध्ये सर्वाधिक शतके करणारा दुसरा फलंदाज : अॅशेस मालिकेचा शेवटचा सामना सध्या सुरू आहे. या मालिकेमध्ये आतापर्यत ऑस्ट्रेलियाचा दबदबा पाहायला मिळाला. ऑस्ट्रेलियाने या मालिकेमध्ये तिसऱ्या सामन्यामध्येच विजय मिळवला होता पण त्यानंतर चौथ्या सामन्यामध्ये इंग्लडने मालिकेमध्ये एक सामना नावावर केला. पाचवा सामना हा सिडनीमध्ये खेळवला जात आहे. हा सामना हाय स्कोरींग सामना झाला. यामध्ये फलंदाजांची चांगली बॅट चालली.
सिडनी कसोटीतील स्टीव्ह स्मिथचे शतक स्वतःमध्ये खूपच खास आहे, कारण त्याने या शतकासह इंग्लंडचा दिग्गज क्रिकेटपटू जॅक हॉब्सला मागे टाकले आहे. स्मिथचे हे १३ वे अॅशेस शतक आहे आणि आता तो या प्रसिद्ध मालिकेच्या इतिहासात सर्वाधिक शतके करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.
13 षटकार, 12 चौकार… राजस्थान राॅयल्सचं नशीब चमकलं! IPL 2026 आधी 21 वर्षीय खेळाडूने झळकावले द्विशतक
या शतकासह स्टीव्ह स्मिथने इंग्लंडचा दिग्गज फलंदाज जॅक हॉब्सला मागे टाकले, ज्यांनी १९०८ ते १९३० दरम्यान १२ शतके केली होती. ऑस्ट्रेलियाचा सध्याचा कसोटी कर्णधार आता फक्त दिग्गज सर डॉन ब्रॅडमन यांच्या मागे आहे, ज्यांनी ३७ अॅशेस कसोटीत १९ शतके केली होती. तथापि, ब्रॅडमनचा विक्रम मोडणे इतके सोपे वाटत नाही.
More #Ashes history for Steve Smith, who brings up another stunning SCG hundred 👏#MilestoneMoment | @nrmainsurance pic.twitter.com/w76y8wGbWy — cricket.com.au (@cricketcomau) January 6, 2026
या कामगिरीमुळे स्टीव्ह स्मिथला आंतरराष्ट्रीय कसोटी शतकांमध्ये त्याची आघाडी वाढविण्यास मदत झाली, हा विक्रम आधीच सचिन तेंडुलकर (५१), जॅक कॅलिस (४५), रिकी पॉन्टिंग (४१), जो रूट (४१) आणि कुमार संगकारा (३८) यांनी मागे टाकला आहे. आधुनिक कसोटी क्रिकेटमध्ये स्मिथ किती महान आहे हे या आकडेवारीवरून दिसून येते.






