नवी दिल्ली – ऑस्ट्रेलियन ओपन २०२३ मधील पुरुष एकेरीच्या विजेतेपदाचा सामना सर्बियाचा नोव्हाक जोकोविच आणि ग्रीसचा स्टेफानोस त्सित्सिपास यांच्यात संपन्न झाला. सर्बियाचा दिग्गज टेनिसपटू नोव्हाक जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद पटकावले आहे. जोकोविचने अंतिम सामन्यात ग्रीसच्या स्टेफानोस त्सित्सिपासचा पराभव करून आपले १०वे विजेतेपद पटकावले. या सामन्यात जोकोविचने सित्सिपासचा ६-३, ७-६, ७-६ असा पराभव केला. जोकोविचच्या कारकिर्दीतील हे एकूण २२वे ग्रँडस्लॅम आहे.
These reactions ? Priceless. @DjokerNole • #AusOpen • #AO2023 pic.twitter.com/GKMVgcMlgf — #AusOpen (@AustralianOpen) January 29, 2023
These reactions ? Priceless. @DjokerNole • #AusOpen • #AO2023 pic.twitter.com/GKMVgcMlgf — #AusOpen (@AustralianOpen) January 29, 2023
शेवटी जोकोविचचं विजयी ठरला
विजेतेपदाच्या लढतीत जोकोविचने शानदार सुरुवात केली आणि पहिला सेट ६-३ आणि दुसरा सेट ७-६ असा जिंकला. आता दुसरा सेट जिंकून जोकोविच हा सामना जिंकेल असे वाटत होते आणि तसेच झाले. ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम फेरीत पोहोचणारा २४ वर्षीय सित्सिपास हा दुसरा सर्वात तरुण पुरुष खेळाडू आहे. त्याआधी जोकोविचने २०११ मध्ये वयाच्या २३व्या वर्षी अंतिम फेरी गाठली होती. जोकोविच आणि त्सित्सिपासमध्ये जे जेतेपद पटकावेल तो एटीपी रँकिंगमध्ये नंबर वन होईल आणि हा सामना जिंकून शेवटी जोकोविचचं विजयी ठरला.
२२व्या ग्रँडस्लॅम विजेतेपदासाठी कोर्टवर उतरला होता
जोकोविच २२व्या ग्रँडस्लॅम विजेतेपदासाठी कोर्टवर उतरला होता. याआधी त्याने नऊ ऑस्ट्रेलियन ओपन, दोन फ्रेंच ओपन, सात विम्बल्डन आणि तीन यूएस ओपनसह एकूण २१ ग्रँडस्लॅम जिंकले होते. सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकण्याच्या बाबतीत फक्त राफेल नदाल जोकोविचच्या पुढे होता. नदालकडे २२ ग्रँडस्लॅम जेतेपदे आहेत. त्याचबरोबर रॉजर फेडरर २० ग्रँडस्लॅमसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र आता त्याने नदालची बरोबरी करत २२ ग्रँडस्लॅम आपल्या नावावर केले.






