बाबर आझम(फोटो-सोशल मीडिया)
NZ vs PAK : पाकिस्तान सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावर आता एकदिवसीय मालिका खेळवली जात आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात बाबर आझमच्या कॅचची चर्चा होऊ लागली आहे. त्याच्या क्षेत्ररक्षणाने चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे. बाबरने न्यूझीलंडचा सलामीवीर राइस मारिऊचा अफलातून असा झेल घेतला आहे. या अफलातून कॅचने क्रिकेट जग अवाक झाले आहे.
पाकिस्तानी खेळाडूंच्या फिटनेसवर नहेमीच प्रश्न उपस्थित केले जाता असतात. मात्र या वादातच बाबर आझमने हवाई सुर घेत पाकिस्तानी खेळाडूंच्या फिटनेसवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिल्याचे बोलले जाता आहे. हवेत डायव्हिंग करत बाबरने अवघड झेलही शक्य करून दाखवला आहे. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होता आहे. बाबरच्या झेलबद्दल चाहतेआपली प्रतिक्रिया देऊ लागले आहे.
किवी संघाच्या डावातील 7 व्या षटकातील दुसरा चेंडू मोहम्मद वसीम ज्युनियरने टाकला होता. बॅटर रायस मारिऊ हा चेंडू नीट समजू शकला नाही आणि चेंडू त्याच्या बॅटची कळ घेऊन हवेत गेला, त्यानंतर बाबरने धावत जाऊन चेंडू पडण्यापूर्वीच हवेत झेप घेऊन अशक्य अशी कॅच शक्य करून दाखवली आहे. बाबरने घेतलेला हा झेल खूपच अवघड मानला जात आहे.
Unbelievable catch by babar azam#PAKvsNZ #NZvPAK #PakistanCricket pic.twitter.com/MWCGTsWgRj
— Urooj Jawed🇵🇰 (@uroojjawed12) April 1, 2025
न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करत 50 षटकात 8 विकेट गमावत 292 धावा केल्या होत्या. पाकिस्तानसाठी मिचेल हेने खेळी करत 99 धावांवर तो नाबाद राहिला आहे. मिचेल हेने 50 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर चौकार ठोकला. मिचेल हेने षटकार ठोकण्यात अपयशी ठरला जर यशस्वी ठरला असता तर मात्र त्याला आपले शतक पूर्ण करता आले असते. मात्र शतक झळकावण्याचे त्याचे स्वप्नभंग झाले आणि तो 99 धावांवर तो नाबाद राहिला. मिचेल हेने हा वनडे क्रिकेटमध्ये 99 धावांवर नाबाद राहणारा जगातील 16 वा आणि न्यूझीलंडचा दुसरा फलंदाज ठरला आहे.
न्यूझीलंडने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ 41.2 षटकांत 208 धावांवर सर्वबाद झाला. न्यूझीलंडने हा सामना 84 धावांनी आपल्या नावे केला. 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत न्यूझीलंड संघाने 2-0 ने आघाडी घेतली आहे. 99 धावांची खेळी करणारा मिचेल हेला सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.