आयपीएलच्या प्ले ऑफ सामन्यांचे वेळापत्रक जाहीर (फोटो- ai gemini )
आयपीएल 2026 च्या प्ले ऑफचे शेड्यूल जाहीर
बंगलोर ऐवजी अहमदाबाला होणार अंतिम सामना
31 मे 2026 ला असणार महामुकाबला
Tata IPL 2026 Playoff Schedule: आयपीएलचा महासंग्राम सुरू होऊन महिना होऊन गेला आहे. स्पर्धा आता अंतिम टप्प्यात येऊन दाखल झाली आहे. त्यातच आता प्ले ऑफचे सामने कुठे आणि किती तारखेला होणार आहेत, याचे वेळापत्रक समोर आले आहे ते जाणून घेऊयात. बीसीसीआयने आयपीएल २०२६ च्या प्लेऑफ आणि फायनलच्या वेळापत्रकात मोठा बदल केला आहे. बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमकडून फायनलचे यजमानपद काढून घेण्यात आले आहे. आता आयपीएलच्या यंदाच्या हंगामाचा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
आयपीएल 2026 चा अंतिम सामना बंगळुरूमध्ये नव्हे तर गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडीयमवर होणार आहे. बीसीसीआयच्या माहितीनुसार, KSCA क्रिकेट असोसिएशन आणि प्रशासनाकडून करण्यात आलेल्या काही मागण्या बीसीसीआयच्या नियमावलीत बसू शकत नव्हत्या. त्यामुळे बीसीसीआयने शेवटच्या क्षणी बंगळुरूकडून अंतिम सामन्याचे यजमानपद काढून घेतले आणि अहमदाबादला दिले.
आयपीएल 2026 प्लेऑफचे संपूर्ण वेळापत्रक
| सामना | तारीख | ठिकाण | शहर |
| Qualifier 1 | 26 मे 2026 | एचपीसीए स्टेडियम (HPCA Stadium) | धर्मशाळा |
| Eliminator | 27 मे 2026 | नवीन आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम | मुल्लानपूर (चंदीगड) |
| Qualifier 2 | 29 मे 2026 | नवीन आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम | मुल्लानपूर (चंदीगड) |
| Final | 31 मे 2026 | नरेंद्र मोदी स्टेडियम | अहमदाबाद |
बातमी अपडेट होत आहे…






