ducati
Range Rover: स्टायलिश लूक अन् दमदार फिचर्स, Range Rover Sport SV भारतात लॉंच; किंमत किती?
Ducati Panigale V4 Lamborghini या सुपर बाईकची किंमत १ कोटी रुपये (एक्स-शोरूम) आहे. तर, ऑन- रोड किंमत १.१५ कोटी रुपये इतकी आहे. ही बाईक, भारतातील सर्वात महागड्या आणि एक्सक्लुझिव्ह बाईक्सपैकी एक आहे. विशेष म्हणजे, या सुपरबाईकची पहिली डिलिव्हरी मुंबईत झाली असून, जगभरातील सर्व युनिट्सची विक्री झाली आहे. ही बाईक अत्यंत मर्यादित संख्येत तयार करण्यात आली होती. जगभरात फक्त ६३० युनिट्स तयार करण्यात आले, त्यापैकी ६३ युनिट्स खास व्हीआयपी ग्राहकांसाठी राखीव होते. यामुळेच ही बाईक लॉन्च होताच जगभरात विकली गेली. तसेच,कंपनी प्रत्येक बाईकसोबत ऑथेंटिसिटीचे सर्टिफिकेट, एक खास कव्हर आणि पर्सन्लाइज्ड बॉक्स देत आहे. तसेच, डुकाटी प्रत्येक पॅनिगाले V4 लॅम्बोर्गिनी बाईकच्या रंगाशी जुळणाऱ्या मागील स्टँडसह, एका कस्टमाइज्ड खास लाकडी क्रेटमध्ये डिलिव्हरी करत आहे.
डुकाटी पॅनिगाले V4 ही लॅम्बोर्गिनी सुपरबाईक पॅनिगाले V4 S वर बेस्ड आहे, परंतु त्यात अनेक बदल आहेत. यात ११०३cc डेस्मोसेडिसी स्ट्राडेल इंजिन आहे, जे २१८.५ हॉर्सपॉवर निर्माण करते आणि सोबत अक्रापोविच टायटॅनियम एक्झॉस्ट आहे. ही सुपरबाईक १२२.१ न्यूटन मीटरचा पीक टॉर्क निर्माण करते. इंधनाशिवाय फक्त १८५ किलो वजन असलेल्या या गाडीचे पॉवर-टू-वेट रेशिओ १.१७ बीएचपी प्रति किलो असल्याचा दावा डुकाटीने केला आहे. डुकाटीने फेअरिंग, फ्रंट आणि मागचे मडगार्ड, चेन गार्ड, हील गार्ड, फोर्क कव्हर्स, एक्झॉस्ट प्रोटेक्शन, अल्टरनेटर कव्हर, लायसन्स प्लेट होल्डर, स्प्रॉकेट कव्हर, टॅंक प्रोटेक्शन, इन्स्ट्रुमेंट माउंट्स आणि रेडिएटर डक्टमध्ये कार्बन फायबरचा मोठ्या प्रमाणावर वापर केला आहे. यात १७-लिटरची ॲल्युमिनियम टाकी आहे.
डुकाटी पॅनिगाले V4 लॅम्बोर्गिनी सुपरबाईकची रचना डुकाटी सेंट्रो स्टाईल आणि डुकाटीच्या डिझायनर्सच्या सहकार्याने करण्यात आली आहे. बाईकची फोर्ज्ड ॲल्युमिनियमची व्हिल्स, टेल पीस आणि विंग्स हे थेट रेव्हुएल्टोच्या डिझाइनपासून प्रेरित आहेत. बाईकची संपूर्ण बॉडी लॅम्बोर्गिनी कार प्रमाणेच हाय- क्वालिटीच्या कार्बन फायबरपासून बनलेली आहे.
Car Tips: कार विकण्याआधी करा ‘या’ सोप्या गोष्टी; मिळेल बेस्ट डिल






