न्यूझीलंडकडून भारताचा पराभव (फोटो - ट्विटर)
भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसऱ्या कसोटी सामन्यात आज न्यूझीलंडने पुन्हा एकदा टीम इंडियाला जेरीस आणले. ३५९ धावांचे लक्ष्य घेऊन उतरलेल्या भारतीय संघाला हे लक्ष्य पेलवले नाही. भारताचा अर्ध्यापेक्षा अधिक संघ पॅव्हेलिनमध्ये परतला. भारताच्या १८० धावांवर ७ विकेट गेल्या आहेत. न्यूझींलडने भारताचा ११३ धावांनी पराभव केला आहे. दरम्यान, भारताने न्यूझीलंडविरुद्धची मालिका गमावली आहे. मात्र कसोटी मालिका गमवल्यानंतर बीसीसीआयने भारतीय संघाबबत एक मोठा निर्णय घेतला आहे. दिवाळीमध्ये भारतीय संघाच्या खेळडूना विश्रांती न देण्याचा निर्णय संघ व्यवस्थापनाने घेतला आहे.
रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाचा न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात दारुण पराभव झाला आहे. या पराभवामुळे भारताने मालिका गमावली आहे. त्यानंतर बीसीसीआयने अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत. दिवाळीमध्ये संघाला विश्रांती न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच सर्वांना २ प्रशिक्षण सत्रे देखील देण्यात येणार आहेत. तिसऱ्या मॅचआधी या प्रशिक्षण सत्रात सहभागी होण्याचे आदेश खेळाडूना देण्यात आले आहेत.
भारत न्यूझीलंडविरुद्ध शेवटचा कसोटी सामना हा १ तारखेपासून खेळणार आहे. दरम्यान त्याआधी प्रशिक्षण सत्रे घेतली जाणार आहेत. यामध्ये रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह अशा बड्या खेळाडूंचा देखील समावेश असण्याची शक्यता आहे. हे सत्र सर्वांना अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे खेळाडू दिवाळीच्या वेळेस देखील सराव करण्यात व्यस्त असणार आहेत.
दुसऱ्या सामन्यात भारताचा पराभव
न्यूझीलंडने भारताचा ११३ धावांनी पराभव केला. भारतीय संघाचे तब्बल ६ फलंदाज सॅंटनरने बाद केले, तर एजाज पटेलने २ विकेट घेत टीम इंडियाला धक्का दिला. त्यानंतर ग्लेन फिलिप्सने १ विकेट घेतली. सॅंटनरने आज भारतीय फलंदाजी मोडीत काढली. टीम इंडियाचे सर्वाधिक फलंदाज सॅंटनरने बाद केले. सॅंटनरने काल ७ आणि आज ६ विकेट घेत एका कसोटीत तब्बल १३ विकेट घेतल्या. भारताकडून सर्वाधिक विकेट सुंदरने घेत्या. वाॅशिंग्टन सुंदरने तब्बल ११ विकेट या कसोटीत घेतल्या.
हेही वाचा: भारताचा होमग्राऊंडवर पुन्हा एक पराभव; किवींनी ११३ धावांनी मिळवला विजय; २-० ने मालिका टाकली खिशात
टीम इंडियाला सर्वाधिक फटका सॅंटनरने दिला. सॅंटनरने आज ५ विकेट घेत भारतीय संघाचे कंबरडे मोडले. सॅंटनरने पहिल्यांदा रोहित शर्माला तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर डॅरेल मिचेलद्वारे शुभमन गिलला झेलबाद करीत पॅव्हेलीनमध्ये पाठवले. विराट कोहली पुन्हा एकदा सॅंटनरच्या ३० व्या ओव्हरमध्ये बाद झाला. सॅंटनरने विराटला पायचित करीत तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर ऋषभ पंत रनआऊट झाला. धमाकेदार गोलंदाजी करणारा सुंदर आज ग्लेन फिलिप्सच्या चेंडूवर बाद झाला. सरफराज खानला तर सॅंटनरने क्लिनबोल्ड करीत पॅव्हेलिनमध्ये पाठवले. आजा रवींद्र जडेजा आणि रवीचंद्रन अश्विन खेळतोय.