फोटो सौजन्य : X
भुवनेश्वर कुमार डान्स व्हिडीओ : भारताचा स्फोटक फलंदाज रिंकु सिंह याने त्याचा साखरपुडा गुपचुप उरकला. या कार्यक्रमाचे अनेक फोटो सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. याआधी फिरकी गोलंदाज कुलदीप यादव याने देखील त्याची लहानपणाची मैत्रीण वंशीका हिच्यासोबत साखरपुडा उरकला आणि त्यानंतर तो इंग्लड दौऱ्यावर रवाना झाला. भारताचा संघ 20 जूनपासुन इंग्लडविरुद्ध मालिका खेळणार आहे, यावेळी भारताचा कर्णधार हा शुभमन गिल असणार आहे.
आता सध्या रिंकु सिंह यांच्या साखरपुड्याचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. रिंकु सिंह याने खासदार सरोज खान हिच्यासोबत बंधनात अडकला आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये भारताचा स्टार वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार हा डान्स करताना दिसत आहे. सुरुवातीला रिंकु सिंहची होणारी पत्नी सरोज खान ही नाचत असते त्यानंतर ती भुवनेश्वर कुमारला खेचुन आणते आणि नाचायला सांगते.
भुवनेश्वर कुमार आणि रिंकु सिंह हे दोघे सड्डी गल्ली या गाण्यावर नाचताना दिसत आहेत. या कार्यक्रमाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
इंडियन प्रीमियर लीग 2025 चा 18 वा सीजन पार पडला या सीजन मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळूरच्या संघाने बाजी मारली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाने मेगा ऑक्शनमध्ये भुवनेश्वर कुमार याला दहा 10.75 कोटीना विकत घेतले होते. मागील सीझनमध्ये भुवनेश्वर कुमार हा सनरायझर्स हैदराबादच्या संघामध्ये होता या सीजनमध्ये त्याला आरसीबीच्या संघाने विकत घेतल्याने त्याने कमालीची कामगिरी केली होती.
रिंकू सिंग आयपीएल 2025 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा भाग होता पण या सीझनमध्ये तो खास कामगिरी करू शकला नाही. या सीजनमध्ये केकेआर चा संघ हा आठव्या स्थानावर राहिला. रिंकू सिंग आणि प्रिया सरोज हे दोघेही लवकरच लग्न बंधनात अडकणार आहेत असे वृत्तानुसार माहिती मिळाली आहे. रिंकू सिंग यांच्या साखरपुड्याला अनेक राजकीय व्यक्तिमत्व त्याचबरोबर क्रिकेट खेळाडू देखील उपस्थित होते. हे दोघेही त्यांच्या साखरपुड्याला फारच सुंदर दिसत होते.