फोटो सौजन्य - सोशल मीडिया
रोहित शर्मा-रिषभ पंत : T20 विश्वचषक 2024 मध्ये भारताच्या संघाने कमालीची कामगिरी केली. भारताच्या संघाने विश्वचषक स्पर्धेमध्ये एकही सामना न गमावता भारताच्या संघाने फायनल गाठली होती. आता त्यानंतर फायनलच्या सामन्यात भारताच्या संघाने सामना गमावला होता. त्यानंतर भारताच्या संघाने शेवटच्या ५ षटकांमध्ये कमाल केली आणि भारताच्या संघाने विश्वचषक नावावर केला. आता नुकतेच भारताचा विजयी संघातील काही खेळाडू द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शोमध्ये आले होते. यावेळी भारताचा कॅप्टन रोहित शर्माने अनेक मोठे खुलासे केले आहेत. T20 विश्वचषक 2024 मधील फायनलच्या सामन्यातील खरा मास्टरमाइंडचा खुलासा कर्णधार रोहित शर्माने केला.
भारताने फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव करत १७ वर्षांनंतर ही ट्रॉफी जिंकली. याचे श्रेय अनेकांनी अंतिम फेरीत सूर्यकुमार यादवने घेतलेल्या झेलला दिले आहे. पण या ऐतिहासिक विजयाच्या तीन महिन्यांनंतर रोहित शर्माने सांगितले की, खरा सामना ऋषभ पंतने त्याच्या एका चतुराईने उलटवला. भारत हा सामना हरेल असे वाटत होते पण प्रथम जसप्रीत बुमराह आणि नंतर हार्दिक पंड्या यांच्या शानदार गोलंदाजीने पुनरागमन केले. सूर्यकुमार यादवने शेवटच्या षटकात डेव्हिड मिलरचा चौकारावर उत्कृष्ट झेल घेतला आणि येथूनच भारताचा विजय निश्चित झाला. मात्र, आता संघाचा कर्णधार रोहितने सांगितले की, पंतने सामन्याच्या मध्यभागी एक चाल केली ज्यामुळे दक्षिण आफ्रिकेकडून जिंकलेला सामना हिसकावून घेतला.
T20 विश्वचषक 2024 च्या संदर्भात रोहित शर्माला प्रश्न विचारण्यात आला. यावेळी रोहित म्हणाला, “त्यांच्याकडे खूप विकेट्स शिल्लक होत्या. सेटचे फलंदाज मैदानात होते. आम्हाला तणाव वाटत होता. पण अशा वेळी कर्णधार मजबूत असला पाहिजे. ही गोष्ट कोणालाच माहीत नाही पण जेव्हा ३० चेंडूत ३० धावा हव्या होत्या. त्याआधी एक छोटासा ब्रेक लागला होता आणि ऋषभ पंतने गुडघ्याला स्पर्श केल्याचे सांगितले होते.
पुढे रोहित म्हणाला, “खेळ सुरू होता, त्यावेळी फलंदाजाला वाटतं की गोलंदाजाने माझ्याकडे पटकन चेंडू टाकावा. लय प्रस्थापित झाली होती, त्यामुळे आम्हाला ती लय तोडावी लागली. मी मैदान सेट करत गोलंदाजांशी बोलत होतो. , जेव्हा मी पंतला पाहतो तेव्हा मी म्हणत नाही की त्याने आमच्या विजयाचे कारण आहे आणि काम पूर्ण झाले.