कोलंबो : आशिया कप (Asia Cup) 2023 सुपर 4 मध्ये दोन दिवस चाललेल्या सर्वात हायव्होल्टेज सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकवर भारताने काल ऐतिहासिक २२८ धावांनी विजय मिळवला आहे. रविवारी भारत विरुद्ध पाकिस्तान (India Vs Pakistan) यांच्यात सामना खेळविण्यात आला, पण सामन्यात पावसाने व्यत्यय आणल्याने हा सामना रिझर्व डेला सोमवारी पुन्हा खेळविण्यात आला. यामुळं भारतासा सलग दोन दिवस खेळावे लागले, यानंतर आज पुन्हा श्रीलंकेसोबत सामना खेळावा लागणार आहे. त्यामुळं भारताला सलग तीन दिवस मैदानावर घाम गाळावा लागणार आहे. टीम इंडिया (Team India) आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) च्या सुपर-4 मधील दुसरा सामना मंगळवार, 12 सप्टेंबर रोजी श्रीलंकेविरुद्ध (Sri Lanka) खेळणार आहे. (Change in the Indian team in the match against Sri Lanka? Will Shami, Surya get a chance? Who will fly? Know the Indian team)
राहुलच्या जागी सूर्याला संधी मिळणार?
दरम्यान, केएल राहुलला विश्रांती मिळू शकते, सूर्याला संधी मिळण्याची शक्यता आहे. या सामन्यात भारतीय क्रिकेट संघाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये मोठे बदल पाहायला मिळू शकतात. या बदलांचं सर्वात मोठं कारण म्हणजे, सलग दोन सामने खेळणं. काल रिझर्व्ह डेच्या दिवशी पाकिस्तान विरोधात सामना खेळल्यानंतर टीम इंडियाला आज पुन्हा श्रीलंकेविरोधात सामना खेळायचा आहे. त्यामुळे सुर्यकुमार यादवला मिडल ऑर्डरमध्ये खेळवलं जाऊ शकतं. तसेच जसप्रीत बुमराहलाही ब्रेक दिला जाऊ शकतो. तसेच, त्याच्याऐवजी मोहम्मद शामीला संधी मिळण्याची शक्यता आहे.
सामना कधी सुरु होणार?
भारत आणि पाकिस्तान यांच्यात रविवारी सामना होता. मात्र या सामन्यात पावसाने व्यत्यय आणल्यामुळं रिझर्व डेला, म्हणजे काल सामना खेळविण्यात आला. यात भारताने पाकवर दणदणीत विजय मिळवला. वेळापत्रकानुसार आज भारताचा श्रीलंकेसोबत सामना आहे. त्यामुळं आज भारताला सलग तिस-या दिवशी मैदानावर घाम गाळावा लागणार आहे. आर प्रेमदासा स्टेडियममध्ये हा सामना होणार आहे. या सामन्याला दुपारी 3 वाजता सुरुवात होणार आहे. तर 2 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे. दासून शनाका श्रीलंकेचं तर रोहित शर्मा टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे.
भारतीय संभाव्य संघ
रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, श्रेयस अय्यर, जसप्रीत बुमराह, ईशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, शार्दुल ठाकुर, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, सूर्यकुमार यादव, प्रसिद्ध कृष्णा आणि तिलक वर्मा.
श्रीलंका संभाव्य संघ
दासुन शनाका (कर्णधार), कुसल मेंडिस (उपकर्णधार), पाथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल जेनिथ परेरा, चरिथ असलांका, धनंजय डी सिल्वा, मथीशा पथिराना, सदीरा समरविक्रमा, महीश थेक्षाना, डुनिथ वेललागे, कासुन राजिथा, दुशान हेमंथा, बिनुरा फर्नांडो आणि प्रमोद मदुशन.