चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध पंजाब किंग्ज (फोटो- सोशल मिडिया)
Chennai Super kings Vs Punjab Kings: आज आयपीएलच्या स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात सामना सुरू आहे. पंजाब किंग्सने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चेन्नई सुपर किंग्सने 20 ओव्हर्समध्ये 190 धावा केल्या. चेन्नई सुपर किंग्जने पंजाब किंग्सला 191 धावांचे लक्ष्य दिले आहे.
चेन्नई सुपर किंग्जने प्रथम फलंदाजी करताना 190 धावा केल्या. यामध्ये सर्वाधिक धावा सॅम करनने केल्या. त्याने 88 धावा केल्या. अन्य सर्वांनी लहान लहान खेळी रत चेन्नईला 190 धावांपर्यंत पोहोचवले. आता पंजाब किंग्जसमोर 191 धावांचे लक्ष्य असणार आहे. चेन्नई पराभवाची मालिका संपवणार की अशीच सुरू ठेवणार ते थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे.
पंजाब किंग्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग यांच्यामध्ये आयपीएल स्पर्धेत ३१ सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये १६ सामन्यांमध्ये चेन्नई सुपर किंग्सला विजय मिळाला आहे तर १५ सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. पंजाब किंग्सने झालेल्या चेन्नईविरुद्ध ३१ सामान्यांमधील १५ सामन्यात विजय मिळाला आहे तर १६ सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. आयपीएल २०२५ मध्ये ३० एप्रिल रोजी चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यामध्ये दुसऱ्यांदा लढत होणार आहे.
वैभव सूर्यवंशीने कोणाला केला पहिला कॉल? व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हीही व्हाल भावुक, Video Viral
दुसरीकडे, पंजाब किंग्जबद्दल बोलायचे झाले तर, त्यांनी ९ सामने खेळले आहेत, त्यापैकी ५ सामने जिंकले आहेत. त्यांचे १० गुण आहेत आणि ते पॉइंट टेबलमध्ये ५ व्या स्थानावर आहेत. पंजाबचा शेवटचा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध होता, जो पावसामुळे रद्द झाला. आयपीएलमध्ये चेन्नई आणि पंजाब यांच्यात आतापर्यंत ३१ सामने खेळले गेले आहेत. यापैकी चेन्नईने १६ सामने जिंकले आहेत, तर पंजाबने १५ सामने जिंकले आहेत. या हंगामात हे दोन्ही संघ एकदा आमनेसामने आले आहेत, ज्यामध्ये पंजाबने चेन्नईचा १८ धावांनी पराभव केला.
चेन्नई सुपर किंग्ज : शेख रशीद, आयुष म्हात्रे, सॅम कुरन, रवींद्र जडेजा, डेवाल्ड ब्रेविस, शिवम दुबे, दीपक हुडा, एमएस धोनी (यष्टीरक्षक/कर्णधार), नूर अहमद, खलील अहमद, मथिशा पाथिराना
पंजाब किंग्स : प्रियांश आर्य, श्रेयस अय्यर (कर्णधार), जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), नेहल वढेरा, शशांक सिंग, हरप्रीत ब्रार, मार्को जॅनसेन, अजमतुल्ला उमरझाई, सूर्यांश शेडगे, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग