मोहम्मद शमी(फोटो-सोशल मीडिया)
IND VS PAK : आशिया कप २०२५ स्पर्धेला ९ सप्टेंबरपासून सुरवात होणार आहे. यावेळी आशिया कप हा टी २० स्वरूपात खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघाने आपला संघ घोषित केला आहे. या संघात भारताचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमीला स्थान देण्यात आलेले नाही. अशातच तो चर्चेत आला आहे. मोहम्मद शमीने एका मुलाखतीदरम्यान काही प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. त्यामुळे त्याची मुलाखत गाजत आहे. त्याला एक प्रश्न भारत आणि पाकिस्तान सामन्यातील मुस्लिम क्रिकेटपटूंवर प्रश्न विचरण्यात आला आहे. त्यावर शमीने दिलेले उत्तर चाहत्यांच्या मनाचा ठाव घेणारे ठरले आहे.
शमीला एका मुलाखतीमध्ये विचारण्यात आले होते की “मुस्लिम क्रिकेटपटूंना जास्त टार्गेट करण्यात येते, कधीकधी भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तानविरुद्ध खेळत असताना ते आणखी जास्त टार्गेट होत असतात”. या प्रश्नावर उत्तर देताना शमीने चाहत्यांची मने जिंकून घेतली आहेत. मोहम्मद शमीने उत्तर देताना म्हटले की, “मी अशा काही ट्रोलिंगकडे लक्ष देत नाही. मला एक काम देण्यात आले असून मी मशीन नाही, जर मी वर्षभर मेहनत घेत राहिलो तर कधी तरी मला ही अपयश येईल तर मी यशस्वी होईन, ते लोकांवर अवलंबून असणार आहे की ते ते त्याकडे कसे बघतात. ”
शमी पुढे बोलताना म्हणाला की, “जेव्हा तुम्ही तुमच्या देशासाठी मैदानावर खेळत असतात तेव्हा तुम्ही या सर्व गोष्टी विसरत असतात. विकेट घेणे आणि सामने जिंकणे इतकेच तुमच्यासाठी अधिक महत्त्वाचे असते. अशा वेळी मला सोशल मीडियावर जाऊ इच्छित नाही. जिथे तुम्हाला सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही प्रकारच्या कमेंट्स बघायला मिळतात. जेव्हा तुम्ही खेळत असता तेव्हा तुम्ही अशा गोष्टींपासून जास्तीत जास्त दूर राहिले पाहिजे.”
भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी पुढे म्हणाला की, “आपण यशस्वी होण्यासाठी कठोर मेहनत करत असतो. ट्रोलर्स फक्त दोन ओळी लिहत असतात. खरे चाहते असे कधीहीकाही बोलत नाहीत. जर तुम्हाला काही आक्षेप असेल तर तो मांडा, पण त्यात आदर असावा. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही माझ्यापेक्षा चांगले करू शकत असाल तर येथे या आणि प्रयत्न करा. ते नेहमीच खुले असते.”
हेही वाचा : ध्रुव जुरेल आणि अभिमन्यू ईश्वरन दुलीप ट्रॉफीचा सामना का खेळत नाहीत? मोठे कारण आले समोर