नाशिकचे ब्रिटिश जिल्हाधिकारी ए.एम.टी. जॅक्सनला गोळ्या घालणारे क्रांतिकारक अनंत कान्हेरे यांचा जन्मदिन (फोटो - टीम नवराष्ट्र)
नाशिकचे ब्रिटिश जिल्हाधिकारी ए.एम.टी. जॅक्सन याची गोळ्या झाडून हत्या करणारे क्रांतिकारक अनंत कान्हेरे यांचा आज जन्मदिन. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यामध्ये अनेकांनी आपली आहुती दिली त्यातील एक म्हणजे अनंत कान्हेरे. अभिनव भारत या संघटनेच्या कार्याचा भाग म्हणून ब्रिटिश सत्तेविरुद्धचा लढा तीव्र केला. १९०९ मध्ये त्यांनी ए.एम.टी. जॅक्सनला गोळ्या घातल्यामुळे त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. २१ डिसेंबर १९०९ रोजी नाशिकच्या विजयानंद नाट्यगृहात एका नाटकाच्या प्रयोगादरम्यान अनंत कान्हेरे यांनी जॅक्सनला गोळ्या घातल्या. ही हत्या भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक महत्त्वाची घटना ठरली. अनंत कान्हेरे यांना वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी त्यांना ठाणे तुरुंगात फाशी देण्यात आली.
07 जानेवारी रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
07 जानेवारी रोजी जन्म दिनविशेष
07 जानेवारी रोजी मृत्यू दिनविशेष






