स्टीफन फ्लेमिंग आणि महेंद्रसिंग धोनी(फोटो-सोशल मीडिया)
IPL 2025 : आयपीएल 2025 च्या 17 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने चेन्नई सुपर किंग्जचा 25 धावांनी पराभव केला आहे. दिल्लीने प्रथम फलंदाजी करत 183 धावांचे लक्ष्य सीएसकेसमोर ठेवले होते. प्रतिउत्तरात चेन्नई संघ 158 धावाच करू शकला. या सामन्यात धोनीची कामगिरी खराब राहिली होती. त्यामुळे तो ट्रोल होताना दिसून येत आहे तसेच या पराभवानंतर महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीच्या बातम्या देखील समोर येऊ लागल्या आहेत. या सामन्यात धोनीने 26 चेंडूचा सामना करत 30 धावा केल्या, पण या धावा काढण्यासाठी त्याला खूप संघर्ष करावा लागला होता. या पराभवानंतर चेन्नई सुपर किंग्जचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, ‘महेंद्रसिंग धोनी अजूनही आयपीएलमध्ये चांगला खेळत आहे आणि तो अद्याप निवृत्त होणार नाही.
हेही वाचा : IPL 2025 : आयपीएल 2025 मध्ये सगळ्यांनी नाकारलं! ‘या’ खेळाडूने रचली 150 वर्षातील सर्वात मोठी धावसंख्या
चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्सच्या सामन्यादरम्यान धोनीचे आई-वडील चेपॉक स्टेडियमवर शनिवारी उपस्थित होते. तेव्हा धोनीच्या निवृत्तीची बातमी पसरली होती. दोघेही पहिल्यांदाच स्टेडियममध्ये आले होते आणि त्यांनी आपल्या मुलाचा सामना पाहिला. या कारणामुळे निवृत्तीच्या अफवेला अधिक जोर आला होता.
नेमकं काय म्हणाले फ्लेमिंग?
दिल्लीविरुद्धच्या सामन्यात चेन्नई 25 धावांनी पराभूत झाल्यानंतर पत्रकार परिषदेत धोनीच्या निवृत्तीबाबतच्या प्रश्नावर फ्लेमिंग म्हणाले की, ‘नाही, त्यांचा प्रवास संपवणे हे माझे काम नाही. मला काही कळत नाही. मला त्याच्यासोबत काम करत असताना मजा येते. तो अजूनही जोरात खेळत आहे. आजकाल मी याबाबत विचारतही नाही. तुम्हीच लोक याविषयी विचारत आहात.’
यापूर्वी धोनीला नवव्या क्रमांकावर पाठवण्यात आल्याच्या निर्णयावर कडाडून टीका करण्यात आली होती. पण शनिवारी हा अनुभवी क्रिकेटपटू सातव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी मैदानात उतरला होता. मात्र, धोनी 26 चेंडूत 30 धावांच करू शकला. त्याला धावा करताना संघर्ष करावा लागत होता. त्याला चेन्नईला सलग तिसऱ्या पराभवापासून वाचवता आले नाही.
फ्लेमिंगने धोनीची पाठराखण करताना सांगितले की, त्यावेळी फलंदाजी करणे खरोखर अवघड होते. तसेच ते म्हणाले की, जेव्हा तो क्रीजवर पोहोचला तेव्हा मला वाटतं की चेंडू थोडासा थांबून येत आहे. आम्हाला समजले की ते पहिल्या काही अर्ध्या वेळात चांगले होईल आणि नंतर ते हळूहळू कमी हॉट जाईल. तसेच फ्लेमिंग म्हणाले की, परिस्थिती लक्षात घेऊन त्याने खरोखरच चांगली कामगिरी केली होती. विजय शंकरला देखील त्याच्या खेळीदरम्यान टायमिंग शोधण्यासाठी संघर्ष करावा लागत होता. त्यामुळे विजय आमच्यापासून दूर होत गेला.