फोटो सौजन्य - IndianPremierLeague सोशल मीडिया
Chennai Super Kings vs Delhi Capitals toss update : चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यामध्ये सामना सुरु झाला आहे. या सामन्यांमध्ये दिल्ली कॅपिटल्सचे कर्णधारपद अक्षर पटेलकडे असणार आहे तर चेन्नई सुपर किंग्सचे कॅप्टन ऋतुराज गायकवाड असणार आहे. या सामन्याचे नाणेफेक दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आजच्या सामन्यांमध्ये चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत. चेन्नई सुपर किंग्सचा संघ सलग दोन पराभवानंतर आता त्यांची नजर या सीझनच्या दुसऱ्या विजयाकडे असणार आहे.
पहिल्या सामन्यांमध्ये चेन्नईच्या संघाने मुंबई इंडियन्सला पराभूत केले होते तर त्यानंतर राजस्थान आणि बंगळुरू या दोन्ही संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या आतापर्यत आयपीएल २०२५ च्या कामगिरीवर नजर टाकली तर दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने आतापर्यत दोन समाने खेळले आहेत यामध्ये त्यांनी दोन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवून पॉईंट टेबलवर दुसऱ्या स्थानावर आहेत.
🚨 Toss 🚨@DelhiCapitals won the toss and elected to bat against @ChennaiIPL
Updates ▶️ https://t.co/5jtlxucq9j #TATAIPL | #CSKvDC pic.twitter.com/YQ2hx92XNM
— IndianPremierLeague (@IPL) April 5, 2025
आजच्या सामन्यांमध्ये चेन्नई सुपर किंग्सच्या संघामध्ये बदल करण्यात आला आहे. यामध्ये आज डेवॉन कॉन्वेला प्लेइंग ११ मध्ये स्थान मिळाले आहे त्याचबरोबर मुकेश चौधरी देखील संघामध्ये स्थान मिळाले आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या संघाबद्दल बोलायचे झाले तर फाफ डू प्लेसी आज सामना खेळणार नाही.
आजचा सामना चेन्नई सुपर किंग्सच्या होमग्राउंडवर सुरु आहे. या सामन्याचे आयोजन एम. ए. चिदंबरम स्टेडियम खेळवला जात आहे. आजचा सामना चेन्नईच्या संघासाठी महत्वाचा असणार आहे. मागील सामन्यांमध्ये चेन्नईच्या फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली होती त्यामुळे आजच्या झालेल्या बदलामुळे फलंदाज कशी कामगिरी करतात यावर चाहत्यांचे लक्ष्य असणार आहे.
रुतुराज गायकवाड़ (कर्णधार), रचिन रवींद्र, डेवॉन कॉन्वे, मथीशा पथिराना, नूर अहमद, खलील अहमद, एमएस धोनी (विकेटकिपर), रवींद्र जड़ेजा, विजय शंकर, रविचंद्रन अश्विन, मुकेश चौधरी
इम्पॅक्ट प्लेयर : शिवम दुबे, कमलेश नागरकोटी, जेमी ओवरटन, शेख रशीद, नेथन एलिस
केएल राहुल (विकेटकिपर), अक्षर पटेल (कर्णधार), जैक फ्रेजर मैक्गर्क, ट्रिस्टन स्टब्स, अभिषेक पोरेल, समीर रिजवी, आशुतोष शर्मा, विपराज निगम, कुलदीप यादव, मिचेल स्टॉर्क, मोहित शर्मा
इम्पॅक्ट प्लेयर : मुकेश कुमार, करुण नायर, दर्शन नळकांडे, डोनोवन फरेरा, त्रिपुराना विजय