फोटो सौजन्य - Star Sport सोशल मीडिया
Chennai Super Kings vs Royal Challengers Bangalore : चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यामध्ये सामना सुरु झाला आहे. यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाचे सलामीवीर फलंदाज विराट कोहली आणि फिल्म सॉल्ट यांनी कमालीची फलंदाजी करायला सुरुवात केली होती. यामध्ये पावर प्लेमध्ये दोन्ही खेळाडूंनी दमदार बॅटचा मारा केला. आतापर्यंत आकरा ओव्हरचा खेळ झाला आहे. यामध्ये ११ ओव्हरमध्ये ११० धावा करून दोन विकेट्स बंगळुरूच्या संघाने गमावले आहेत. आता ज्याप्रकारे फिल्ल सॉल्टला महेंद्रसिंह धोनीने सर्वच चकित झाले.
आयपीएल २०२५ च्या ८ व्या सामन्यात, एमएस धोनीने त्याच्या वेगवान स्टंपिंगसह फिल सॉल्टला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. या स्टंपिंगसाठी त्याला सुमारे 0.10 सेकंद लागले, फक्त धोनी हे काम करू शकतो. हे स्टंपिंग पाहून दुसऱ्या टोकाला उभा असलेला विराट कोहलीही हैराण झाला. या सामन्यात, एमएस धोनीने चेन्नईसाठी धोका निर्माण करणाऱ्या फिल साल्टला स्टंप आउट केले आणि संघाला मोठे यश मिळवून दिले. क्रीजबाहेर जाऊन शॉट खेळल्याबद्दल फिल साल्टला मोठी किंमत मोजावी लागली. याआधी सूर्यकुमार यादवलाही अशाच प्रकारे स्टंपआउट करण्यात आले होते.
Ladies & gentlemen, presenting the GEN GOLD who never gets OLD! ⚡🔥#MSDhoni pulls off yet another lightning-fast stumping and this time, it’s #PhilSalt who’s left stunned! 😮💨💪🏻
Watch LIVE action ➡ https://t.co/MOqwTBm0TB#IPLonJioStar 👉 #CSKvRCB | LIVE NOW on Star Sports… pic.twitter.com/kK3B5jxhXT
— Star Sports (@StarSportsIndia) March 28, 2025
एमएस धोनी हा सध्याच्या काळात विकेटमागे सर्वात वेगवान विकेटकीपर म्हणून ओळखला जातो. चालू हंगामात त्याने दोनदा स्टंप आउट करून हे दाखवून दिले आहे. काही सेकंदातच तो फलंदाजांना संपवतो. शुक्रवारी, फिल सॉल्टचा पाय थोड्याच वेळासाठी क्रीजबाहेर आला आणि त्या वेळी धोनीने चित्त्याच्या चपळतेने यष्टी उडवून दिल्या.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या डावाच्या पाचव्या षटकात, फिल सॉल्टने नूर अहमदविरुद्ध शॉट खेळण्याचा प्रयत्न केला पण तो पूर्णपणे फसला आणि चेंडू धोनीच्या ग्लोव्हजमध्ये पडला. शॉट खेळल्यानंतर, फिल सॉल्ट क्रीजच्या आत येण्याचा प्रयत्न करताना दिसला, त्याचा उजवा पाय क्रीजच्या थोडा बाहेर होता पण त्याच वेळी धोनीने स्टंप विखुरले. काही वेळाने फील्ड पंचांनीही निर्णय तिसऱ्या पंचांकडे पाठवला. १६ चेंडूत ३२ धावा करून फिल साल्ट बाद झाला. त्याने त्याच्या डावात ५ चौकार आणि १ षटकार मारला. याआधी, पहिल्या सामन्यात एमएस धोनीने मुंबई इंडियन्सचा फलंदाज सूर्यकुमार यादवला यष्टीचीत केले होते .