फोटो सौजन्य : BCCI/X
डेल स्टेनची भविष्यवाणी : भारत विरुद्ध इंग्लड यांच्यामध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेमध्ये टीम इंडीयाचे नेतृत्व शुभमन गिल करणार आहे. भारताच्या अनेक नव्या खेळाडूंना या मालिकेमध्ये स्थान मिळाले आहे. भारताच्या संघाने या मालिकेआधी इंग्लड लायन्स विरुद्ध दोन सामन्याची मालिका खेळली यामध्ये दोन्ही सामने हे अनिर्णयीत राहिले. इंग्लडचा संघ हा बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. मालिकेतील पहिला सामना २० जून रोजी लीड्समध्ये खेळला जाणार आहे. त्यासाठी टीम इंडिया जोरदार सराव करत आहे.
शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली इंग्लंडच्या भूमीवर युवा टीम इंडियाची परीक्षा होणार आहे. ही एक लांब मालिका असणार आहे जी ऑगस्टपर्यंत चालेल. दोन्ही संघांसाठी ही जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या नवीन चक्राची सुरुवात असेल. त्याच वेळी, दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज डेल स्टेनने मालिकेबद्दल एक मोठी भविष्यवाणी केली आहे आणि ही मालिका कोणता संघ जिंकेल हे सांगितले आहे?
काल झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाला हरवून दक्षिण आफ्रिकेने पहिल्यांदाच जेतेपद पटकावले. दक्षिण आफ्रिकेच्या विजयावर डेल स्टेनही खूप आनंदी दिसत होता. यादरम्यान, त्याने जिओ हॉटस्टारवर भारत आणि इंग्लंड कसोटी मालिकेबद्दल सांगितले की, “सर्व सामने जवळचे असतील. पण सर्वांचा निकाल लागेल. मला वाटते की इंग्लंड ही मालिका ३-२ ने जिंकेल. प्रत्येक कसोटी सामन्याचा निकाल लागेल. कोणताही संघ सहज जिंकणार नाही, सर्व पाचही सामने खूप जवळचे असतील.” स्टेनचा असा विश्वास आहे की इंग्लंड ही मालिका जिंकणार आहे.
“It will be an historic day” #DaleSteyn analyzes day 3 of the #WTCFinal as #SouthAfrica stands 69 runs from destiny, with glory now just a session away? 🫣
Are we going to see a new World Test Champion on Day 4? 🤩
📺 #WTCFinal 👉 #SAvAUS | Day 4, SAT, 14th June, 2:30 PM on… pic.twitter.com/yn9zcXcYRd
— Star Sports (@StarSportsIndia) June 14, 2025
टीम इंडिया इंग्लंडमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोन दिग्गजांशिवाय खेळणार आहे. या दोन्ही भारतीय दिग्गजांनी मालिकेपूर्वी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे, त्यामुळे टीम इंडिया इंग्लंडमध्ये एका कठीण परीक्षेला सामोरे जाणार आहे. दुसरीकडे, इंग्लंडचा त्यांच्या घरच्या मैदानावरचा रेकॉर्डही खूप चांगला आहे.
प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम यांच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने घरच्या मैदानावर २० कसोटी सामने खेळले आहेत, त्यापैकी १५ सामने जिंकले आहेत, ४ सामने गमावले आहेत आणि एक सामना अनिर्णित राहिला आहे.