फोटो सौजन्य : BCCI
आयसीसीच्या नियमांमध्ये होणार बदल : आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचा सामना काल संपला आहे, यामध्ये दक्षिण आफ्रिकेच्या संघाने बाजी मारली आहे. आयसीसीने पुरुष क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅट्स – एकदिवसीय, कसोटी आणि टी-२० इंटरनॅशनलच्या खेळण्याच्या परिस्थितीत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. या बदलांमध्ये कन्कशन सब्स्टिट्यूटपासून ते एकदिवसीय सामन्यांमध्ये दोन नवीन चेंडू वापरण्यापर्यंतचे नियम अपडेट करणे समाविष्ट आहे. आयसीसी पुरुष समितीने जारी केलेले बदल कसोटी सामन्यात १७ जून, एकदिवसीय सामन्यात २ जुलै आणि टी२० सामन्यात १० जुलैपासून लागू होणार आहेत अशी माहिती दिली आहे.
आतापर्यंत एकदिवसीय क्रिकेटमध्ये दोन नवीन चेंडू वापरण्यात येत होते, दोन्ही टोकांवरून २५-२५ षटकांसाठी एक नवीन चेंडू वापरला जात होता, ज्यामध्ये आता थोडा बदल दिसून येणार आहे. याचा फायदा गोलंदाजांना होणार आहे. तिन्ही फॉरमॅटमध्ये हे नियम कधी बदलतील याची तारीखही जाहीर करण्यात आली आहे.
या नियमांमध्ये बदल करण्याची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. हे सुधारित नियम १७ जूनपासून कसोटी, २ जुलैपासून एकदिवसीय आणि १० जुलैपासून टी-२० स्वरूपात लागू केले जातील. एकदिवसीय क्रिकेटमध्ये अजूनही २ नवीन चेंडू वापरले जातील, परंतु ते २५ व्या षटकापर्यंत नव्हे तर ३४ व्या षटकापर्यंत वापरले जातील. याशिवाय, दोन्ही संघांना ३५ ते ५० षटकांपर्यंत गोलंदाजी सुरू ठेवण्यासाठी त्या २ चेंडूंपैकी एक निवडावा लागेल. तर जर सामना ५० ओव्हरवरून २५ ओव्हरपर्यंत कमी केला गेला तर फक्त एकच चेंडू वापरला जाणार आहे.
आतापर्यंतच्या नियमांनुसार, गोलंदाजांना शेवटच्या षटकांमध्ये चेंडू उलटवणे खूप कठीण होते. त्यामुळे एकदिवसीय सामन्यांमध्ये खूप मोठे धावसंख्या पाहायला मिळत होती, परंतु आता गोलंदाजांची चिंता दूर करण्यासाठी आयसीसीने हा नियम बदलला आहे, ज्यामुळे गोलंदाजांना खूप मदत होणार आहे.
आता कर्णधारांना नाणेफेकीपूर्वी त्यांच्या ५ कन्कशन सबस्टिट्यूट खेळाडूंची नावे द्यावी लागणार आहेत. आतापर्यंत असे नव्हते आणि सामन्यादरम्यान कोणताही खेळाडू कन्कशन सबस्टिट्यूट म्हणून खेळू शकत होता. आता कर्णधारांना या ५ खेळाडूंमधून एक फलंदाज, एक ऑलराउंडर, एक विकेटकीपर, एक स्पिनर आणि एक वेगवान गोलंदाज निवडावा लागेल.