फोटो सौजन्य - Delhi Capitals
दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्स टाॅस अपडेट : रविवारी म्हणजेच १८ मे रोजी डबल हेडर सामना खेळवला जाणार आहे. यामध्ये दुसरा सामना हा दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या संघासाठी आजचा सामना खूप महत्त्वाचा असणार आहे. आजच्या सामन्यात गुजरात टायटन्सच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर गुजरात टायटन्सच्या संघाला या सामन्यात विजय मिळाल्यास संघ प्लेऑफमध्ये स्थान पक्के करेल. दिल्ली कॅपिटल्सने या सीजनमध्ये दमदार सुरुवात केली होती पण त्यानंतर संघाची फलंदाजी ढासळली आणि त्यामुळे संघ सध्या गुणतालिकेमध्ये पाचव्या स्थानावर आहे.
आजच्या सामन्यामध्ये दिल्ली कॅपिटल्सचा मुख्य गोलंदाज मिचेल स्टार्क संघाचा भाग नसणार आहे. त्यामुळे त्याच्या जागेवर आज संघामध्ये मुस्ताफिजूर रहमानला संघामध्ये स्थान मिळाले आहे. त्याचबरोबर गुजरात टायटन्सची प्लेइंग इलेव्हनमध्ये आज कगिसो रबाडाला संघामध्ये स्थान मिळाले आहे. दिल्ली कॅपिटलच्या संघाने पराभूत झालेल्या सामन्यांमध्ये त्यांची फलंदाजी निराशाजनक राहिली आहे. त्यामुळे आजचा सामन्यात त्यांच्या फलंदाजी वर चाहत्यांची नजर असणार आहे.
🚨 Toss 🚨@gujarat_titans won the toss and elected to bowl against @DelhiCapitals in Delhi.
Updates ▶ https://t.co/4flJtasOHE #TATAIPL | #DCvGT pic.twitter.com/U0kTR7hboL
— IndianPremierLeague (@IPL) May 18, 2025
गुजरात टायटन्सचे सलामीवीर फलंदाज साई सुदर्शन आणि जोस बटलर या जोडीने यास हंगामात कमालीची फलंदाजी केली आहे आणि संघाला चांगले सुरुवात करून दिली आहे त्यामुळे आजच्या सामना त्यांच्या कामगिरीवर चाहत्यांची नजर असणार आहे. गुजरात टायटन्सचा फलंदाज जोस बटलर उर्वरित सामन्यांमध्ये खेळणार नाही त्यामुळे नक्कीच संघाला त्याची कमी जाणवेल. फाफ डुप्लेसी मागील सामन्यामध्ये चांगली कामगिरी केली होती पण तो संघाला विजयापर्यंत नेऊ शकला नव्हता त्यामुळे आता कामगिरीवर आज विशेष लक्ष असणार आहे.
शुभमन गिल (कर्णधार), शेरफेन रदरफोर्ड, जोस बटलर (यष्टीरक्षक), शाहरुख खान, राहुल तेवतिया, अर्शद खान, साई किशोर, कगिसो रबाडा, रशीद खान, मोहम्मद सिराज, प्रसीद कृष्णा.
फाफ डू प्लेसिस, अभिषेक पोरेल (यष्टीरक्षक), केएल राहुल, समीर रिझवी, अक्षर पटेल (कर्णधार), विपराज निगम, ट्रिस्टन स्टब्स, मुस्ताफिजूर रहमान, कुलदीप यादव, टी नटराजन.