फोटो सौजन्य - Delhi Capitals/Mumbai Indians सोशल मीडिया
Delhi Capitals vs Mumbai Indians : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यामध्ये उद्या सुपर संडेमध्ये सामना रंगणार आहे. एकीकडे मुंबई इंडियन्सचा संघ या स्पर्धेमध्ये सातत्याने पराभवाचा सामना करत आहे तर दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्सचा हा संघ स्पर्धेतील एकमेव संघ आहे जो एकही सामना हरलेला नाही. आतापर्यंत मुंबई इंडियन्सचे पाच सामने झाले आहेत यामध्ये त्यांना ४ सामन्यामध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे तर मुंबईने एकमेव सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध जिंकला आहे. दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्सचा संघाने या स्पर्धेमध्ये कौतुकास्पद कामगिरी केली आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने या स्पर्धेमध्ये आतापर्यंत ४ सामने खेळले आहेत यामध्ये त्यांनी चारही सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. सध्या ते पॉईंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर आहेत.
दिल्ली कॅपिटल्सचा संघ सातत्याने अक्षर पटेलच्या नेतृत्वात चांगली कामगिरी करत आहे तर हार्दिक पांड्याच्या संघाला पराभवाला सामोरे जावे लागत आहे. आता या सामन्याबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. सुपर संडेमधे दोन सामने खेळवले जाणार आहेत. यामध्ये पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध राजस्थान रॉयल्स आणि दुसरा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्या होणार आहे. सुपर संडेच्या दुसऱ्या सामन्यात बदल होणार अशी माहिती समोर आली आहे नक्की काय यासंदर्भात सविस्तर वाचा.
A Ro-Ko powered Super Sunday awaits! 💥🧡❤💛🔵
Will Rohit & Kohli steal the show or will the GEN BOLD rise to shine in this blockbuster double-header?
Don’t miss this #TATAIPL Super Sunday 👉 #RRvsRCB – SUN 13 APR, 2:30 PM & #DCvsMI – SUN 13 APR, 6:30 PM LIVE on Star Sports… pic.twitter.com/AFnLanz33d
— Star Sports (@StarSportsIndia) April 12, 2025
दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यामध्ये १३ एप्रिल रोजी सुपर संडेचा दुसरा सामना खेळवला जाणार आहे. या सामना संध्याकाळी ७.३० वाजता सुरू होणार आहे या सामन्याच्या अर्ध्या तासाआधी म्हणजेच ७ वाजता सामन्याचे नाणेफेक होईल. या सामन्याचे थेट प्रक्षेपण टेलिव्हिजनवरील स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहत येणार आहे, त्याचबरोबर सामन्याची लाईव्ह स्ट्रीमिंग जिओहॉटस्टारवर दाखवली जाणार आहे.
मुंबई विरुद्ध दिल्ली हे दोन्ही संघ या सीझनमध्ये पहिल्याच भिडणार आहेत या स्पर्धेमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ एक मजबूत संघ आहे त्यामुळे मुंबई इंडियन्सला दिल्लीच्या घरच्या मैदानावर पराभूत करेल सोपे नसेल. मुंबईला या सामन्यात कमबॅक करण्याची संधी आहे आणि मागील सामन्यामध्ये झालेल्या चुका सुधारण्याची संधी असणार आहे.