फोटो सौजन्य - X
Piyush Chawla Stats : भारताच्या अनेक खेळाडूंनी मागील दोन वर्षात निवृत्तीची घोषणा केली आहे आणि त्यामुळे भारतीय संघामध्ये अनेक अनुभवी खेळाडूंनी क्रिकेटला अलविदा केला आहे. 2024 च्या विश्वचषक झाल्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनीही निवृत्तीची घोषणा केली. काही दिवसांपूर्वीच रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनीही कसोटी क्रिकेट मधून देखील निवृत्ती घेतली आहे त्याचबरोबर यामध्ये अश्विन चे देखील समावेश आहे. भारताचे खेळाडू आता इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहेत यावेळी भारताचा कर्णधार हा कसोटी फॉर्मेटमध्ये शुभमन गिल असणार आहे. रोहित शर्माचा निवृत्तीनंतर गेली याच्या हाती कर्णधार पदाची कमान देण्यात आले आहे.
आता भारतीय क्रिकेटला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. भारतात स्टार स्पिनर्स आणि चॅम्पियन खेळाडू पियुष चावला याने देखील त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला आहे त्याने तीनही फॉरमॅट मधून निवृत्तीची घोषणा काल म्हणजेच सहा जून रोजी केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून त्याने क्रिकेटला अलविदा केला आहे. 2007 टी 20 विश्वचषक विजेत्या संघाचा भाग असलेला त्याचबरोबर 2011 चा विश्वचषक जिंकणारा पियुष चावला याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. आयपीएलच्या करिअरमध्ये त्याने 192 विकेट्स घेतले आहेत. 2025 मध्ये झालेल्या इंडियन प्रीमियर लीग मध्ये तो कॉमेंटेटर म्हणून पाहायला मिळाला.
Arjun Erigaisi ने Magnus Carlsen ला केलं चेकमेट! सामन्यात पराभव पण स्पर्धेत मिळवला विजय
पियुष चावला हा आयपीएलच्या करिअरमध्ये मुंबई इंडियन्स त्याचबरोबर कोलकाता नाईट रायडर्स या संघांकडून खेळताना पाहायला मिळाला त्याने मुंबई इंडियन्स साठी चांगली कामगिरी केली आहे त्याचबरोबर विजय संघाचा भाग देखील राहिला आहे. महेंद्रसिंग धोनी याच्या नेतृत्वात तो खेळला होता पण त्याला भारतीय संघासाठी जास्त का खेळण्याची संधी मिळाली नाही. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने 25 सामने खेळले होते यामध्ये त्याने 32 विकेट्स नावावर केले होते. आयपीएल मध्ये त्याचा धबधबा पाहायला मिळाला होता त्याचबरोबर त्याने त्याच्या फिरकी गोलंदाजीने जगाला कमाल दाखवली होती.
2⃣0⃣0⃣7⃣ ICC World T20 Winner 🏆
2⃣0⃣1⃣1⃣ ICC Cricket World Cup Winner 🏆Congratulations to Piyush Chawla on a memorable career 👏#TeamIndia pic.twitter.com/h3OKrPMRwA
— BCCI (@BCCI) June 6, 2025
इंडियन प्रीमियर लीग मध्ये त्याने त्याच्या करिअरमध्ये 192 सामने खेळले आहेत या 192 सामन्यात त्याने 192 विकेट्स घेतले होते. फर्स्ट क्लास क्रिकेट मध्ये देखील त्याचा कमालीचा खेळ त्याने दाखवला होता त्याने आत्तापर्यंत फर्स्ट क्लास क्रिकेट मध्ये 137 सामने खेळले होते यामध्ये त्याने 446 विकेट्स घेतले होते. लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्याने संघासाठी १६४ सामने खेळले आहेत यामध्ये त्याने 254 विकेट्स घेतले आहेत. त्याच्या टी20 करिअरमध्ये त्याने 297 सामन्यामध्ये 319 विकेट्स नावावर केले आहेत.