फोटो सौजन्य - सोशल मीडिया
दुलीप ट्रॉफी २०२४ : दुलीप ट्रॉफी २०२४ चा हंगाम सुरु आहे आणि यामध्ये अनेक नवनवे युवा खेळाडू चमकताना दिसत आहेत. अनेक भारताचे दिग्गज खेळाडू सुद्धा या देशांतर्गत स्पर्धेमध्ये सहभागी झाले आहेत. भारताच्या क्रिकेट संघामधील रिषभ पंत, अक्षर पटेल, केएल राहुल, शुभमन गिल अशा अनेक खेळाडूंचा समावेश आहे. अनेक युवा खेळाडूंना सुद्धा दुलीप ट्रॉफीमध्ये स्थान मिळाले आहे. यामध्ये भारताच्या संघामधील ध्रुव जुरेल सुद्धा दुलीप ट्रॉफी खेळत आहे. पहिला सामना भारत अ आणि भारत ब यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात ध्रुव जुरेल भारत अ संघाकडून खेळत आहे. पहिल्या डावात केवळ २ धावा करून तो बाद झाला. तर दुसऱ्या डावात तो शून्यावर बाद झाला. मात्र तरीही त्याचे कौतुक होत आहे. त्याचे कारण म्हणजे अप्रतिम विकेटकीपिंग.
भारत अ आणि भारत ब सामन्यात ध्रुव जुरेलने उत्कृष्ट विकेटकिपिंग केले. त्याने माजी दिग्गज भारतीय खेळाडू महेंद्रसिंग धोनीच्या विक्रमाची बरोबरी केली जात आहे. खरं तर, ध्रुव जुरेल दुलीप ट्रॉफीच्या एका डावात सर्वाधिक झेल घेणारा यष्टिरक्षक बनला आहे. या बाबतीत त्याने धोनीची बरोबरी केली आहे. धोनीने २००४-०५ मध्ये पूर्व विभागाकडून खेळताना एका डावात ७ झेल घेतले होते. आता जुरेलने ७ झेलही घेतले आहेत. या यादीत सुनील बेंजामिन तिसऱ्या क्रमांकावर आहे. १९७३-७४ हंगामात सेंट्रल झोनकडून खेळताना त्याने 6 झेल घेतले. धोनीने बेंजामिनचा विक्रम मोडला होता. आता जुरेलने त्याच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.
I.C.Y.M.I Dhruv Jurel pulled off another stunner to dismiss the last innings centurion Musheer Khan 👌👌#DuleepTrophy | @IDFCFIRSTBank Follow the match ▶️ https://t.co/eQyu38Erb1 pic.twitter.com/6w5THkZElW — BCCI Domestic (@BCCIdomestic) September 7, 2024
भारत आणि बांगलादेश यांच्यात १९ सप्टेंबरपासून कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी जुरेलला संधी दिली जाऊ शकते. अवघ्या २३ वर्षांच्या जुरेलने टीम इंडियासाठी कसोटी पदार्पण केले आहे. मात्र त्याला अद्याप अनेक सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळालेली नाही.