स्टीव्ह स्मिथ(फोटो-सोशल मीडिया)
हेही वाचा : AUS vs ENG : बॉक्सिंग डे कसोटी विजयानंतर बेन स्टोक्स आणि जो रूट झाले भावूक! मैदानाच्या मध्यभागी केलं खास
इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाला फक्त १५२ धावा करता आल्या. प्रत्युत्तरात, इंग्लंडचा पहिला डाव ११० धावांवर गारद झाला. ज्यामुळे ऑस्ट्रेलियाला ४२ धावांची आघाडी मिळाली. दुसऱ्या डावात इंग्लंडने शानदार गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियाला १३२ धावांवर रोखले. इंग्लंडसमोर विजयासाठी १७५ धावांचे लक्ष्य होते, जे इंग्लंडने फक्त ६ विकेट्स गमावून साध्य केले आणि या मालिकेतील पहिला विजय नोंदवला. या सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने क्षेत्ररक्षण करताना २ झेल घेतले. यासह त्याच्या नावे एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ हा स्लिपमधील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकांपैकी एक आहे.
हेही वाचा : ENG vs AUS : 2025 अॅशेस मालिकेचा पहिला विजय पडला इंग्लंडच्या पदरात! 4 विकेट्सने जिंकला चौथा सामना
राहुल द्रविडच्या नावे कसोटी क्रिकेटमध्ये २१० झेल टिपण्याची नोंद आहे तर स्टीव्ह स्मिथने आता २१२ झेल घेतले आहेत. या यादीत अव्वल स्थानी असलेल्या जो रूटच्या नावे कसोटी क्रिकेटमध्ये २१४ झेल टिपण्याची नोंद आहे. क्षेत्ररक्षणासह स्टीव्ह स्मिथने फलंदाजीतही अनेक मोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत. पॅट कमिन्स बाहेर झाल्यामुळे स्मिथकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. २०१० मध्ये त्याला ऑस्ट्रेलियाकडून पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. त्याला ऑस्ट्रेलियाकडून १२२ कसोटी सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. यादरम्यान त्याने १० हजारांहून अधिक धावा केल्या आहेत.






