आज नामिबिया आणि भारत आमनेसामने(फोटो-सोशल मीडिया)
IND vs NAM, T20 World Cup 2026: भारतीय संघ आज टी२० विश्वचषक २०२६ स्पर्धेत आपला दुसरा सामना खेळणार आहे. १२ फेब्रुवारी रोजी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर नामिबियाविरुद्ध भारत दूसरा सामना खेळणार आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील संघाने या स्पर्धेची आमरिकेला पराभूत करत विजयी सुरुवात केली. आजच्या सामन्यात देखील भारतीय संघ तीच लय कायम ठेवून नामीबियाला देखील पराभूत करण्याचे लक्ष्य ठेवणार आहे. दरम्यान, ज्या मैदानावर भारत आणि नामीबिया संघ आमनेसामने येणार आहेत, त्या मैदानावर भारतीय संघाचा रेकॉर्ड कसा आहे? याबद्दल आपण जाणून घेऊया,
हेही वाचा : IND vs PAK, T20 World Cup 2026 : ‘भारताविरुद्ध वेगळ्या मानसिकतेने….’ पाकिस्तानच्या साहीबजादा फरहानचे विधान
दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर भारतीय संघाच्या टी२० आंतरराष्ट्रीय विक्रमावर नजर टाकल्यास सजमते की, संघाने आतापर्यंत तेथे चार सामने खेळले असून यापैकी भारताने दोन सामन्यात विजय मिळवला आहे तर दोन सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे. भारताने २०१७ मध्ये येथे न्यूझीलंडविरुद्ध पहिला टी-२० आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता, ज्यामध्ये संघाने ५३ धावांनी विजय मिळवला होता. त्यानंतर २०१९ मध्ये बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाला ७ विकेटने पराभव स्वीकारावा लागला होता.
२०२२ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात देखील भारताला ७ विकेट्सने पराभव पत्करावा लागला होता. या मैदानावर भारताचा शेवटचा सामना २०२४ मध्ये बांगलादेशविरुद्ध खेळला गेला होता, जिथे ब्लु आर्मीने ८६ धावांनी दमदार विजय मिळवला होता. त्यामुळे, या मैदानावर विजयाची टक्केवारी सुधारण्यासाठी भारतीय संघ प्रयत्न करणार आहे.
दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या संध्याकाळी सामन्यांमध्ये दव महत्त्वाची भूमिका बाजवणार आहे. म्हणूनच टॉस जिंकणारे संघ नंतर फलंदाजी करताना दवाचा फायदा घेण्यासाठी प्रथम गोलंदाजी करण्याचा पर्याय निवडत असतात. या मैदानावर आतापर्यंत एकूण ९ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळवण्यात आले आहेत. त्यापैकी प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने ४ सामन्यात विजय मिळवला आहे. तर लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाने ५ सामने जिंकले आहेत. या आकडेवारीवरून स्पष्ट होते की या मैदानावर धावांचा पाठलाग करणे तुलनेने सोपे जाते.
भारतीय संभाव्य इलेव्हन : संजू सॅमसन, इशान किशन, टिळक वर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रिंकू सिंग, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग
नेपाळ संभाव्य इलेव्हन: लॉरेन स्टीनकॅम्प, जॅन फ्रायलिंक, जॅन निकोल लोफ्टी-ईटन, गेरहार्ड इरास्मस (सी), जेजे स्मित, झेन ग्रीन (विकेटकीपर), डायलन लीचर, रुबेन ट्रम्पेलमन, विलेम मायबर्ग, बर्नार्ड शॉल्ट्झ, मॅक्स हेंगो






