फोटो सौजन्य - सोशल मिडिया
Australia vs England 4th Test Result : ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये पाच सामन्याच्या कसोटी मालिकेमधील चौथा सामना दुसऱ्याच दिवशी संपला आहे. या मालिकेच्या पहिल्या तीन सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघाने विजय मिळवल्यानंतर आता चौथ्या सामन्यामध्ये इंग्लंडचे नशीब उघडले आहे आणि त्यांचा हा मालिकेचा पहिला विजय नावावर करण्यात यश मिळाले आहे. इंग्लडच्या संघाने आणि ऑस्ट्रेलियाने या दोघांचीही या सामन्यामध्ये फार काही चांगली फलंदाजी राहिली नाही. गोलंदाजांचे वर्चस्व या सामन्यामध्ये पाहायला मिळाले.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यामध्ये इंग्लंडच्या संघाने 4 विकेट्सने विजय मिळवला आहे. यासह मालिकेमध्ये आता 3-1 अशी ऑस्ट्रेलियाच्या संघााकडे आघाडी आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये मेलबर्न क्रिकेट मैदानावर हा सामना पार पडला. या सामन्यामध्ये इंग्लंडच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पहिले फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाच्या संघाला इंग्लंडने 152 धावांवर रोखले. तर इंग्लडच्या संघाला ऑस्ट्रेलियाने पहिल्या इंनिगमध्ये 110 धावांवर रोखले पहिल्या डावानंतर ऑस्ट्रेलियाच्या संघाकडे आघाडी होती.
Jacob Bethell top-scores with 40 as we complete our first Test win in Australia since 2011. The series may have gone, but that’s a result to be proud of 🤝 pic.twitter.com/lkuzSY4Iar — England Cricket (@englandcricket) December 27, 2025
दुसऱ्या डावामध्ये देखील इंग्लंडच्या गोलंदाजांची चांगली कामगिरी पाहायला मिळाली. इंग्लंडच्या गोलंदाजांनी दुसऱ्या डावामध्ये ऑस्ट्रेलियाला 132 धावांवर रोखले होते. तर इंग्लंडसमोर ऑस्ट्रेलियाच्या संघाने दुसऱ्या डावाच्या फलंदाजीनंतर 175 धावांचे लक्ष उभे केले होते. हे लक्ष इंग्लडच्या संघाने 31.2 ओव्हरमध्ये पार केले. ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंच्या कामगिरीबद्दल सांगायचे झाले तर पहिल्या डावामध्ये ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक धावा या मायकेल नेसर याने केल्या त्याने 35 धावांची खेळी खेळली. तर दुसऱ्या डावामध्ये ट्रॅव्हिस हेड याने संघासाठी 46 धावांची खेळी खेळली.
पीटरसननंतर, वॉनने ऑस्ट्रेलियाची घेतली शाळा…भारताला दिले समर्थन! आयसीसीने शिक्षा देण्याची केली मागणी
इंग्लंडच्या संघासाठी पहिल्या डावामध्ये हॅरी ब्रुक याने 41 धावांची खेळी खेळली. तर दुसऱ्या डावामध्ये जेमी स्मिथ याने संघासाठी 40 धावा केल्या. मागील काही दिवसांपासून हि मालिका सध्या चर्चेत आहे. इंग्लडंच्या संघाला या मालिकेमध्ये आणखी एक विजय नोंदवण्याची संधी आहे. गोलंदाजांची चांगली कामगिरी राहिली पहिल्या डावामध्ये जोश टंग याने 5 विकेट्स नावावर केले होते, तर मायकेल नेसर याने फलंदाजीमध्येच नाही तर गोलंदाजीमध्ये देखील कमाल केली होती आणि त्याने पहिल्या डावामध्ये 5 विकेट्स नावावर केले होते.






