फोटो सौजन्य - X सोशल मीडिया
इंग्लंड कसोटी संघ : सध्या भारतामध्ये इंडियन प्रीमियर लीगची चर्चा सुरु आहे. त्यानंतर भारताचा पुरुष संघ इंग्लंड विरुद्ध मालिका खेळणार आहे. यावेळी टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर असणार आहे यासाठी भारताच्या संघाने अजूनपर्यत संघाची घोषणा केलेली नाही. याआधी आता इंग्लड क्रिकेट बोर्डाने संघाची घोषणा केली आहे. इंग्लंडचा संघ २२ मे पासून झिम्बाब्वेविरुद्ध मालिकेला सुरुवात करणार आहे, यासाठी संघाची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये बेन स्टोक्स संघाची कमान सांभाळताना दिसणार आहे.
इंग्लंड क्रिकेट बोर्डाने २२ मे रोजी ट्रेंट ब्रिज येथे होणाऱ्या झिम्बाब्वेविरुद्धच्या एकमेव कसोटीसाठी १३ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीनंतर भारताविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी कर्णधार बेन स्टोक्सचे पुनरागमन अपेक्षित होते परंतु त्याचे खेळणे संशयास्पद होते. तथापि, या अष्टपैलू खेळाडूने चांगली प्रकृती सुधारली आणि त्याला संघात समाविष्ट करण्यात आले आहे. सॅम कुक आणि जॉर्डन कॉक्स या दोन अनकॅप्ड खेळाडूंनाही संघात स्थान मिळाले आहे. भारत आणि नंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या तयारीसाठी सॅम कुक आणि जॉर्डन कॉक्स यांना बोलावण्यात आले आहे.
अनुभवी अष्टपैलू खेळाडू ख्रिस वोक्स SA20 मध्ये झालेल्या दुखापतीतून अद्याप बरा झालेला नाही. इंग्लंड संघ व्यवस्थापन देखील त्याला घाईघाईने संघात घेऊ इच्छित नाही कारण या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या अॅशेसमध्ये तो महत्त्वाची भूमिका बजावेल अशी अपेक्षा आहे. दुसरीकडे, जेकब बेथेल सध्या आयपीएल २०२५ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळत असल्याने त्याला संघातून वगळण्यात आले आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) या तरुण खेळाडूला आयपीएलमध्ये राहण्यासाठी एनओसी दिली आहे. त्याने आतापर्यंत तीन कसोटी सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने ५२ च्या सरासरीने २६० धावा केल्या आहेत.
Who are you most excited to see in action this summer? 🤔#ENGvZIM | #EnglandCricket pic.twitter.com/hfkH862LEM
— England Cricket (@englandcricket) May 2, 2025
वेगवान गोलंदाज मार्क वूड देखील कसोटीतून बाहेर पडेल. तो अजूनही गुडघ्याच्या दुखापतीतून सावरत आहे. गस अॅटकिन्सन आणि मॅथ्यू पॉट्स यांनाही प्लेइंग ११ मध्ये स्थान मिळू शकते. भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत आपले स्थान पक्के करण्याची ही दोघांसाठीही चांगली संधी आहे.
बेन स्टोक्स (कर्णधार), गस अॅटकिन्सन, शोएब बशीर, हॅरी ब्रुक, सॅम कुक, जॉर्डन कॉक्स, झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, मॅथ्यू पॉट्स, जो रूट, जेमी स्मिथ, जोश टंग.