फोटो सौजन्य - X सोशल मीडिया
पाकिस्तानी क्रिकेट खेळाडूंचे भारतात सोशल मीडिया अकाउंट बॅन : पहलगाम हल्ल्यानंतर भारतामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक संतप्त झाले आहेत. सोशल मीडियावर भारतीय नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. २२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला, ज्यामध्ये २६ निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला. या हल्ल्यानंतर भारत सरकार कृतीत आहे. आतापर्यंत भारतात अनेक पाकिस्तानी कलाकार आणि खेळाडूंचे सोशल मीडिया अकाउंट बंद करण्यात आले आहेत. यामध्ये आता फक्त पाकिस्तानी कलाकारांचेच नाही तर आता पाकिस्तानच्या खेळाडुनचे अकाउंट देखील बॅन करण्यात आले आहेत अशी माहिती समोर आली आहे.
भारतामध्ये पाकिस्तानी कलाकारांसह पाकिस्तानी खेळाडूंचे देखील अकाउंट बॅन करण्यात आले आहे खेळाडूंचे अकाउंट सोशल मीडियावर भारतीय युझर्सला दिसत नाही आहे. याआधी कलाकारांना भारतामध्ये बंदी घालण्यात आली आता या भागात पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि आताच कर्णधार मोहम्मद रिजवान आणि बाबर आझम यांची नावे या यादीमध्ये सामील झाली आहेत. भारत सरकारने पाकिस्तानचा स्टार खेळाडू बाबर आझम आणि कर्णधार मोहम्मद रिझवान यांचे भारतातील सोशल मीडिया अकाउंट बंद केले आहेत. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सरकारने हा निर्णय घेतला आहे. या दोन खेळाडूंव्यतिरिक्त, स्टार गोलंदाज शाहीन आफ्रिदीविरुद्धही एक कठोर निर्णय घेण्यात आला आहे. त्याचे सोशल मीडिया अकाउंटही बंद करण्यात आले आहे.
🚨 INSTAGRAM ACCOUNTS OF BABAR AZAM & SHAHEEN AFRIDI HAVE BEEN BANNED IN INDIA 🚨 pic.twitter.com/tOp6iDT5n8
— gugobet (@gugobetofficial) May 2, 2025
भारतीय क्रिकेट खेळाडूंना बॅन करण्याआधी, शाहिद आफ्रिदी आणि शोएब अख्तर सारख्या खेळाडूंच्या यूट्यूब चॅनेलवर भारतामध्ये बॅन करण्यात आले होते. याशिवाय, हानिया आमिर, माहिरा खान सारख्या अनेक प्रसिद्ध पाकिस्तानी कलाकारांचे सोशल मीडिया अकाउंटही भारतात ब्लॉक करण्यात आले आहेत. २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला ज्यामध्ये काही पर्यटकांना गोळ्या घालण्यात आल्या. या हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला. हा हल्ला पाकिस्तानमधील लष्कर-ए-तैयबाने केल्याचे सांगितले जात आहे.
हिटमॅनने युवा वैभवचं वाढवलं मनोबल, रोहित शर्मा जिंकलं चाहत्यांच मनं! Video Viral
धक्कादायक बाब म्हणजे या हल्ल्यानंतर शाहीन आफ्रिदी आणि जुनैद खान सारख्या काही पाकिस्तानी क्रिकेटपटूंनी भारताची खिल्ली उडवली. यानंतर, भारत सरकारने कठोर कारवाई करत पाकिस्तानी क्रिकेटपटूंचे सोशल मीडिया अकाउंट बंद करण्यास सुरुवात केली. केवळ क्रिकेटपटूच नाही तर भारताने शोएब अख्तर, बासित अली यांसारख्या माजी खेळाडूंचे अकाउंट आणि अनेक पाकिस्तानी बातम्या आणि क्रीडा युट्यूब चॅनेल देखील ब्लॉक केले. आता या पाकिस्तानी यूट्यूब चॅनेल्स आणि अकाउंटना मोठे नुकसान सहन करावे लागू शकते याचे कारण म्हणजेच मोठ्या प्रमाणात पाकिस्तानी ड्रामा युट्युबवर पहिला जात होता, त्यांना भारतातून भरपूर व्ह्यूज आणि कमाई मिळत होती.