अमेरिकेची महिला कुस्तीपटू सारा ली (Sara Lee) हिचे अवघ्या ३० व्या वर्षी निधन झाले. तिच्या निधनाची बातमी आल्यानंतर सर्वस्थरातून शोक व्यक्त होत आहे.
सारा ली ही WWE मधील प्रसिद्ध महिला कुस्तीपटू होती. तिने WWE ची Tough Enough ही स्पर्धा २०१५ मध्ये जिंकली होती. तसेच साराने कंपनीच्या NXT या शोमध्ये देखील २०१६ मध्ये भाग घेतला होता.
साराच्या मृत्यूनंतर WWE ट्विट केले की, ‘WWE ला सारा लीच्या मृत्यूची बातमी ऐकून दुःख झाले आहे. Tough Enough ही स्पर्धा जिकंणारी सारा ली ही क्रीडा आणि मनोरंजन जगतासाठी प्रेरणा होती. WWE साराच्या कुटुंबियांच्या, मित्र आणि चाहत्यांच्या दुःखात सामील आहे.’
WWE is saddened to learn of the passing of Sara Lee. As a former “Tough Enough” winner, Lee served as an inspiration to many in the sports-entertainment world. WWE offers its heartfelt condolences to her family, friends and fans. pic.twitter.com/jtjjnG52n7
— WWE (@WWE) October 7, 2022
साराच्या मृत्यूचे कारण किंवा कारण कुटुंबाने जाहीर केले नाही, परंतु सूत्रांच्या माहितीनुसार सायनस संसर्ग हे तिच्या मृत्यूचे कारण ठरले. सारा हिच्या पश्च्यात तिच्या कुटुंबात तिची आई, पती वेस्ली ब्लेक आणि तीन लहान मुलं आहेत.