फोटो सौजन्य - X सोशल मीडिया
Champions Trophy 2025 : भारताच्या संघाने चॅम्पियन ट्रॉफी जिंकली आणि त्याचा आनंद संपूर्ण भारत देशाने साजरा केला. या सेलिब्रेशनचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. भारतीय जनता पक्षाने आरोप केला आहे की तेलंगणा पोलिसांनी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताच्या विजयाचा आनंद साजरा करणाऱ्या लोकांवर लाठीचार्ज केला. भाजपने एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे ज्यामध्ये पोलिस लोकांवर लाठीमार करताना दिसत आहेत. या घटनेबाबत भाजपने काँग्रेस सरकारवर प्रश्न उपस्थित केले आहेत. रविवारी झालेल्या रोमांचक अंतिम सामन्यात न्यूझीलंडला हरवून भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली.
भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी पोलिसांच्या कारवाईचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यांनी लिहिले की, ‘चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताच्या विजयाचा आनंद साजरा करण्यापासून लोकांना रोखण्यासाठी हैदराबाद पोलिसांनी दिलकुशनगरमध्ये लाठीचार्ज केला. करीमनगरमध्येही अशीच एक घटना घडली. काँग्रेसशासित राज्यांची ही नवी युक्ती आहे का? त्यांनी पुढे विचारले, ‘ते कोणाला खूश करण्याचा प्रयत्न करत आहेत?’ भारतीय लोक त्यांच्याच देशाच्या जातीचा उत्सव साजरा करण्यासाठी कुठे जातील? सध्या या घटनेबाबत काँग्रेस किंवा तेलंगणा पोलिसांकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
कर्णधार रोहित शर्माच्या (७६ धावा) अर्धशतकाच्या जोरावर भारताने रविवारी येथे झालेल्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडला चार विकेट्सने हरवून आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ जिंकली. हे भारताचे सलग दुसरे आयसीसी जेतेपद आहे. अंतिम सामन्यात २५२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने ४९ षटकांत सहा गडी गमावून २५४ धावा करून विजय मिळवला. श्रेयस अय्यरने ४८ धावा आणि शुभमन गिलने ३१ धावा केल्या. अक्षर पटेलने २९ धावांचे योगदान दिले. केएल राहुलने नाबाद ३४ आणि रवींद्र जडेजाने नाबाद ९ धावा करत संघाला विजय मिळवून दिला. नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या न्यूझीलंडने डॅरिल मिशेल (६३) आणि मायकेल ब्रेसवेल (नाबाद ५३) यांच्या अर्धशतकांच्या मदतीने ७ बाद २५१ धावा केल्या.
भारतीय गोलंदाजांबद्दल बोलायचं झालं तर टीम इंडियासाठी वरुण चक्रवर्ती आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतले तर रवींद्र जडेजा आणि मोहम्मद शमी या दोघांच्या हाती प्रत्येकी एक विकेट लागला. भारताच्या फिरकी गोलंदाजांनी संघासाठी कमालीची कामगिरी केली आहे. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.