याच दिवशी भारताने क्रिकेटच्या इतिहासात ठोकले होते पहिले शतक, लाला अमरनाथ यांनी रचला होता इतिहास
On this day Cricket History 17th December : क्रिकेट हा खेळ शतकानुशतके जुना आहे आणि त्याने ब्रिटीश राजवटीत भारतात प्रवेश केला. एकदिवसीय क्रिकेटची सुरुवात खूप नंतर झाली कारण इतिहासातील पहिला एकदिवसीय सामना 1971 मध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात खेळला गेला. त्याआधी अनेक दशके टीम इंडियाने 1932 मध्ये कसोटी पदार्पण केले होते. टीम इंडियाचे प्रतिनिधित्व करताना सचिन तेंडुलकर, विराट कोहली आणि सुनील गावस्कर यांसारख्या दिग्गजांनी आपल्या कारकिर्दीत अनेक शतके झळकावली आहेत. पण, या सगळ्याच्या अनेक दशकांपूर्वी जाणून घ्या कोणत्या खेळाडूने भारतासाठी क्रिकेटमधलं पहिलं शतक झळकावलं होतं?
लाला अमरनाथांचे शतक, भारताचे पहिले शतक
He might have scored just one international hundred, but it was the first-ever Test century from an Indian cricketer! Happy birthday to Lala Amarnath, who led 🇮🇳 to their first Test series win against Pakistan and was also the captain in their first tour to Australia 🙌 pic.twitter.com/5nVOurEWgq — ICC (@ICC) September 11, 2019
तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना मुंबईत
१९३३ मध्ये इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर आला होता. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना मुंबईत खेळला गेला. सीके नायडू टीम इंडियाचे कर्णधार होते, दुर्दैवाने भारताचा पहिला डाव केवळ 219 धावांवर आटोपला. प्रत्युत्तरात इंग्लंडने पहिल्या डावात 438 धावा केल्या आणि 219 धावांची मोठी आघाडी घेतली. या पहिल्या डावात मोहम्मद निसारने भारताकडून एकूण 5 बळी घेतले.
भारताचे पहिले शतकवीर
इंग्लंड पहिल्या डावात 219 धावांनी पुढे होता. भारतीय संघ पुन्हा फलंदाजीला आला तेव्हा सय्यद वझीर अली आणि जनार्दन नवले ही सलामीची जोडी २१ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली होती. लाला अमरनाथ तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि कर्णधार सीके नायडूसोबत त्याने दुसऱ्या डावात 186 धावांची जबरदस्त आणि शानदार भागीदारी केली. नायडू 67 धावा करून बाद झाले, पण लाला अमरनाथ बराच वेळ क्रीजवर राहिले आणि त्यांनी 118 धावांची खेळी खेळली.
कसोटी कारकिर्दीतील हे एकमेव शतक
अमरनाथच्या कसोटी कारकिर्दीतील हे एकमेव शतक होते कारण 1936 मध्ये विजयनगरमच्या महाराजासोबत झालेल्या वादानंतर त्याला टीम इंडियातून वगळण्यात आले होते. त्यानंतर 1947 च्या स्वातंत्र्यानंतर टीम इंडियात त्यांचे पुनरागमन झाले. भारताच्या स्वातंत्र्यानंतर अमरनाथ यांना भारतीय संघाचा पहिला कर्णधार बनवण्यात आले.






