टिम इंडिया(फोटो-सोशल मीडिया)
Anil Kumble’s birthday special : आज म्हणजेच १७ ऑक्टोबर रोजी भारतीय संघांचा माजी स्टार फिरकीपटू अनिल कुंबळे त्याचा ५५ वा वाढदिवस साजरा करत आहे. एकाच कसोटी डावात १० विकेट्स घेण्याची किमया करणारा फिरकीपटूने त्याच्या कारकिर्दीत १,७०० हून अधिक विकेट्स घेतल्या आहेत. अनिल कुंबळेने त्याच्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि पाकिस्तानविरुद्ध शतक देखील ठोकले होते. तरी त्यानंतर त्याच्या कारकिर्दीला एक वळण मिळाले आणि तो भारताच्या महान फिरकीपटूंपैकी एक फिरकीपटू बनला.
हेही वाचा : Ranji Trophy 2025 : भारतीय संघाने वेळोवेळी नाकार! आता कर्णधार होताच रजत पाटीदारने द्विशतक झळकवून दिला इशारा
१७ ऑक्टोबर १९७० रोजी कर्नाटकातील बेंगळुरू येथे जन्म झालेल्या अनिल कुंबळेने १९८९ मध्ये भारतीय अंडर-१९ संघाकडून खेळताना पाकिस्तानविरुद्ध शतक झळकवले होते. त्याने पहिल्या कसोटी सामन्यात ११३ धावा कुटल्या होत्या, तर दुसऱ्या सामन्यात ७६ धावांची खेळी केली होती. तथापि, त्याने फिरकी गोलंदाज म्हणून टीम इंडियामध्ये प्रवेश केला. १९९० मध्ये श्रीलंकेविरुद्ध त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर त्याने कधीही मागे वळून पाहिले नाही आणि अनेक विक्रम आपल्या नावावर केले. २००२ मध्ये, अनिल कुंबळे जबडा मोडला असताना देखील कुंबळेने वेस्ट इंडिजविरुद्ध शानदार गोलंदाजी करत सर्वांना आश्चर्यचकित केले होते.
अनिल कुंबळेने आपल्या कामगिरीच्या जोरावर जवळपास प्रत्येक भारतीय विक्रम आपल्या नावावर आहे. १९९९ मध्ये, त्याने दिल्लीत पाकिस्तानविरुद्ध एका डावात सर्व दहा बळी घेण्याचा मोठा पराक्रम केला आहे. डिसेंबर २००१ मध्ये, बंगळुरूमधील त्याच्या घरच्या मैदानावर, तो ३०० कसोटी विकेट्स घेणारा पहिलाच भारतीय फिरकी गोलंदाज देखील ठरला होता. जवळजवळ एक वर्षानंतर, तो एकदिवसीय सामन्यात असा पराक्रम करणारा पहिला खेळाडू ठरला आहे.
ऑगस्ट २००७ मध्ये, द ओव्हल येथे, त्याने ग्लेन मॅकग्राचा ५६३ विकेट्सचा विक्रम मोडीत काढला होता. त्याच्या ३७ व्या वाढदिवसानंतर एका महिन्यापेक्षा कमी कालावधीत, त्याला २००७-०८ च्या पाकिस्तानविरुद्धच्या घरच्या मालिकेसाठी भारताचा कसोटी कर्णधार म्हणून देखील नियुक्त करण्यात आले होते. कुंबळेने आपल्या कारकिर्दीचा शेवट कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज (६१९) म्हणून केला.
हेही वाचा : जसप्रीत बुमराह की जेम्स अँडरसन, कोण सर्वोत्तम? माजी ब्रिटिश पंतप्रधानांनी दिली ‘या’ गोलंदाजाला पसंती
अनिल कुंबळेने टीम इंडियासाठी १३२ कसोटी सामने खेळले आहेत. त्याने २३६ डावांमध्ये ६१९ विकेट्स घेण्याची किमया साधली आहे. तसेच त्याने यासोबत २,५०६ धावा देखील फटकावल्या आहेत. ज्यात त्याने एक शतक आणि पाच अर्धशतकांचा समावेश आहे. अनिल कुंबळेने २७१ एकदिवसीय सामने देखील खेळले असून त्याने ३३७ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच ९३८ धावाही केल्या आहेत. अनिल कुंबळेने त्याच्या कारकिर्दीत जवळजवळ १,७०० बळी टिपले आहेत. यासोबत तो कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा जगात चौथा आणि भारतातील पहिला सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे.