फोटो सौजन्य - सोशल मीडिया
शुभमन गिलचे शतक : भारताचे अनेक खेळाडू सध्या रणजी ट्रॉफी स्पर्धेमध्ये सहभागी झाले आहेत. भारताच्या संघाने बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये केलेल्या निराशाजनक कामगिरीमुळे भारताचे कोच गौतम गंभीर यांनी देशातंर्गत क्रिकेट खेळण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर बीसीसीआयने खेळाडूंना सक्त ताकीद दिली आहे की, देशांतर्गत क्रिकेट खेळणे अनिवार्य आहे. यामध्ये भारताचा कर्णधार रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, रिषभ असे अनेक खेळाडू सध्या रणजी ट्रॉफीमध्ये खेळत आहेत. पण मागील दोन दिवसांपासून या खेळाडूंनी फार काही चांगली कामगिरी केली नाही. भारताचा अनुभवी अष्टपैलू रवींद्र जडेजा याने रणजीमध्ये कमालीची कामगिरी करून दाखवली आहे.
आता भारताच्या संघासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज शुभमन गिलला चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी त्याचा हरवलेला फॉर्म सापडला आहे. गिलने रणजी ट्रॉफीमध्ये आपल्या शानदार फलंदाजीने सर्वांची मने जिंकली आहेत. कठीण परिस्थितीत शुभमनने शानदार खेळ करत दमदार शतक झळकावले. गिलचे हे शतक अशा वेळी घडले जेव्हा पंजाब संघ ८४ धावांवर ६ विकेट गमावल्यानंतर पूर्णपणे बॅकफूटवर होता. गिलने आतापर्यंत १४ चौकार आणि तीन गगनचुंबी षटकार मारले आहेत.
PAK vs WI : 38 वर्षीय पाकिस्तानी फिरकीपटू वेस्ट इंडिजसाठी ठरला खलनायक, हॅट्ट्रिक घेऊन रचला इतिहास
शुभमन गिल इंग्लंडविरुद्धची एकदिवसीय मालिका आणि चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी फॉर्ममध्ये परतला आहे. पंजाबकडून कर्नाटकविरुद्ध खेळताना गिलने दमदार शतक केले आहे. कठीण परिस्थितीत गिलच्या बॅटने हे शतक झळकावले. दुस-या डावात एकवेळ पंजाबचा संघ ८४ धावांवर ६ विकेट गमावून अडचणीत सापडला होता. मात्र, गिलने एका टोकाला उभे राहून ११९ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. पन्नास धावा केल्यानंतर गिलने आपली वृत्ती दाखवत पुढच्या ४० चेंडूत ५० धावा जोडत दमदार शतक झळकावले.
HUNDRED FOR CAPTAIN SHUBMAN GILL…!!!!
– A terrific knock from Gill when there was no support from any Punjab batter, a One man show at Chinnaswamy, He is preparing well for Champions Trophy 🇮🇳 pic.twitter.com/HpesxgIoJh
— Johns. (@CricCrazyJohns) January 25, 2025
पंजाबच्या वतीने शुभमन गिल एकटा लढत आहे. गिलने मयंक मार्कंडेसोबत सातव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. मयंक पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर गिलने सुखदीप बाजवासोबत आठव्या विकेटसाठी ३७ धावांची भागीदारी केली. मात्र, गिलच्या शतकानंतरही पंजाबला पराभव टाळणे फार कठीण दिसत आहे. पहिल्या डावात अवघ्या ५५ धावा करून पंजाबचा संपूर्ण संघ गडगडला. प्रत्युत्तरात कर्नाटकने ४७५ धावा केल्या आणि पहिल्या डावाच्या जोरावर ४२० धावांची मोठी आघाडी घेतली.