फोटो सौजन्य : IndianPremierLeague
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स विरुद्ध लखनऊ सुपर जॉईंट्स यांच्यामध्ये सामना सुरू आहे. या सामन्यात गुजरातचा कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकले आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये लखनऊच्या संघाने पहिले फलंदाजीचे आव्हान स्वीकारत मिचेल मार्श आणि ईडन मार्करम या दोघांनी आणखी एकदा संघाला दमदार सुरुवात करून दिली. पहिले फलंदाजी करून लखनऊच्या संघाने गुजरात समोर 236 धावांचे लक्ष्य उभे केले आहे. हा सामना गुजरातच्या संघासाठी फार महत्त्वाचा आहे त्यामुळे आजच्या पहिल्या डावामध्ये दोन्ही संघांची कामगिरी कशी राहिली यासंदर्भात सविस्तर वाचा.
लखनऊ सुपर जायंट्स या संघाच्या फलंदाजी बद्दल सांगायचे झाले तर संघाने पहिला विकेटचा दहाव्या ओव्हरमध्ये गमावला. आजच्या सामन्यात आणखी एकदा मिचेल मार्श याने अर्धशतक झळकावले. एडन मारक्रम याने आजच्या सामन्यात 24 चेंडूंमध्ये 36 धावा केल्या. यामध्ये त्याने दोन षटकार आणि तीन चौकार मारले. मिचेल मार्श याने आजच्या सामन्यात धावांचा पाऊस पडला. त्याने आज त्याने शतक ५६ चेंडूमध्ये पूर्ण केले.
आजच्या सामन्यात दमदार खेळी खेळली आणि ६४ चेंडूमध्ये ११७ धावा केल्या. यामध्ये त्याने १० चौकार मारले तर ८ षटकार ठोकले. निकोलस पुरण याने अर्धशतक ठोकले आणि नाबाद खेळी खेळली. त्याने आजच्या सामन्यात २७ चेंडूमध्ये 56 धावा केल्या. यामध्ये ४ चौकार आणि ५ षटकार मारले. त्यांच्या या खेळीने आज चाहत्यांना प्रभावित केले. संघाचा कर्णधार ऋषभ पंत शेवटचे काही चेंडू शिल्लक असताना परंतु जिल्हा आला होता आज त्याने काही चांगले मोठे शॉर्ट मारले. ऋषभ पंत्याने संघासाठी आजच्या सामन्यात सहा चेंडूंमध्ये 16 धावा केल्या आणि या सामन्यात दोन षटकार मारले.
Innings Break!
Showmanship from the #LSG batters helps them post a commendable total of 235/2 on the board. 🔥#GT‘s chase on the other side.
Scorecard ▶ https://t.co/NwAHcYJT2n #TATAIPL | #GTvLSG pic.twitter.com/Y2LhcAbAQs
— IndianPremierLeague (@IPL) May 22, 2025
गुजरातच्या गोलंदाजांच्या हाती आज फक्त दोन विकेट्स लागले यामध्ये एक विकेट हा अर्शद खानने घेतला यामध्ये त्याने मिचेल मार्शला आऊट केले . तर दुसरा विकेट हा साई किशोरी याने घेतला