गुजरात टायटन्सचा बंगलोरवर विजय (फोटो - ट्विटर)
Royal Challengers Bangalore Vs Gujarat Titans: आयपीएल 2025 च्या 18 व्या हंगामातील 14 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि गुजरात टायटन्स यांच्यात पार पडला. या सामन्यात गुजरात टायटन्स विजय प्राप्त केला आहे. गुजरातच्या संघाने बंगलोरच्या संघाचा 8 विकेट्सने पराभव केला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या संघाने गुजरतला 170 धावांचे लक्ष्य दिले होते. गुजरातने हे लक्ष्य 13 चेंडू राखून पूर्ण केले.
गुजरातच्या विजयात जोस बटलर आणि साई सुदर्शन यांनी महत्वाची भूमिका पार पाडली. गुजरातने सलग दुसरा विजय प्राप्त केला आहे. तर आरसीबीचा या हंगामातील पहिला पराभव झाला आहे.
दोन्ही संघाचे हेड टू हेड रेकॉर्ड
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात आयपीएलमध्ये आतापर्यंत 5 सामने खेळवण्यात आले आहेत. ज्यामध्ये आरसीबीने 3 सामने आपल्या नावावर केले आहेत. तर गुजरातने दोन सामन्यात विजय प्राप्त केला आहे. गेल्या हंगामात दोन्ही संघांमध्ये 2 सामने झाले होते. दोन्ही सामन्यात आरसीबीने बाजी मारली होती.
चिन्नास्वामी स्टेडियवर आयपीएल सामन्याचा रेकॉर्ड..
आयपीएलच्या इतिहासात बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर एकूण 11 सामने खेळले गेले आहेत. ज्यामध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 41 सामने आपल्या नावे केले आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या संघाने 50 सामने जिंकले आहेत. तर 4 सामन्यांचा निकाल लागू शकला नाही. आयपीएल 2024 मध्ये या मैदानावर लीगची सर्वात मोठी धावसंख्या उभारण्यात आली होती. सनरायझर्स हैदराबादने आरसीबीविरुद्ध 287 धावा केल्या होत्या. या स्टेडियमची सर्वात कमी धावसंख्या 82 धावांची नोंदवण्यात आली आहे.
आरसीबी आणि जीटीचे 11
आरसीबीचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन: विराट कोहली, फिलिप सॉल्ट, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), टिम डेव्हिड, क्रुणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेजलवुड, यश दयाल.
गुजरात टायटन्सची संभाव्य प्लेइंग इलेव्हन: जोस बटलर (यष्टीरक्षक), शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, शेरफेन रदरफोर्ड, शाहरुख खान, रशीद खान, राहुल तेवतिया, साई किशोर, कागिसो रबाडा, प्रसीद कृष्णा, मोहम्मद सिराज.