फोटो सौजन्य - सोशल मीडिया
हॅप्पी बर्थडे क्रिस गेल : वेस्ट इंडिज संघ म्हंटल की डोळ्यासमोर येते ती त्यांची विस्फोटक फलंदाजी. वेस्ट इंडिजचा संघ आता जरी कमकुवत असला पण एकेकाळी त्यांच्या संघाने जगभरामध्ये थैमान घातलं होत. वेस्ट इंडिजच्या संघामधील खेळाडूंसमोर समोरच्या विरोधकांना घाम येत असे. वेस्ट इंडिजचा दिग्गज विस्फोटक फलंदाज क्रिस गेल जगाराभरामध्ये प्रसिद्ध आहे. त्याचे चाहते जागतिक कानाकोपऱ्यामध्ये पसरलेले आहेत. वेस्ट इंडिजचा माजी खेळाडू आणि ‘युनिव्हर्स बॉस’ म्हणून प्रसिद्ध असलेला ख्रिस गेल आज त्याचा ४५ वा वाढदिवस साजरा करत आहे. ख्रिस गेलला समोर पाहून चांगले गोलंदाज आपली लाईन आणि लेन्थ विसरायचे.
वेस्ट इंडिजच्या या धडाकेबाज फलंदाज क्रिस गेलचा जन्म १ सप्टेंबर १९७९ रोजी किंग्स्टन, जमैका येथे झाला. ख्रिस गेलने वेस्ट इंडिजसाठी ४८३ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत आणि यादरम्यान त्याने संघाला अनेक संस्मरणीय विजय मिळवून दिले आहेत.ख्रिस गेलने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत सर्व फॉरमॅटमध्ये अनेक विक्रम केले. ज्यामध्ये कसोटीतील त्रिशतक, वनडेतील द्विशतक आणि T२० मधील अनेक शतकांचा समावेश आहे. क्रिकेटच्या मैदानावर गेलची कामगिरी अगणित आहे. ख्रिस गेल हा वेस्ट इंडिजसाठी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा खेळाडू आहे. T२० फॉरमॅटबद्दल बोलायचे झाले तर गेलने या फॉरमॅटमध्ये १४,००० हून अधिक धावा केल्या आहेत आणि १,००० हून अधिक षटकार ठोकले आहेत.
ख्रिस गेलची गोष्ट गरिबीतून उठून जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू बनण्याची आहे. ख्रिस गेलला त्याच्या सुरुवातीच्या काळात खूप आर्थिक संकटाचा सामना करावा लागला होता. आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्याला प्लास्टिकच्या बाटल्या गोळा करून विकायच्या होत्या. या काळात तो एका झोपडीत राहत असे. ख्रिस गेलने एका मुलाखतीत त्याच्या आयुष्यातील या संघर्षाची कहाणी सांगितली होती. ख्रिस गेलच्या म्हणण्यानुसार, त्याची आई कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी चिप्स विकायची. मुलभूत गरजांसाठी झगडत असताना आणि लहानपणी अत्यंत गरिबीचा सामना करूनही ख्रिस गेलने हिंमत गमावली नाही. जिथे एकेकाळी भुकेमुळे चोरी करावी लागायची तिथे आता तो गरिबांना पोट भरण्याचे काम करतो. आज ख्रिस गेल आपल्या कुटुंबासोबत खूप छान आयुष्य जगत आहे. त्यांची एकूण संपत्ती ३७७ कोटी रुपये आहे. रॅगपिकर होण्यापासून ते क्रिकेट सुपरस्टार बनण्यापर्यंतचा त्याचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.