फोटो सौजन्य - BCCI
भारत विरुद्ध युएई : भारताचा महिला क्रिकेट संघ सध्या आशिया कपमध्ये युएईविरुद्ध सामना खेळत आहे. या सामन्यामध्ये युएईच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय त्यांना चांगला महागात पडला आहे. भारताच्या संघाने फलंदाजीचा आव्हान स्वीकारून युएई समोर २०२ धावांचे लक्ष्य उभे केले आहे. भारताच्या फलंदाजांनी आशिया कपमध्ये दमदार सुरुवात केली आहे. पहिल्या सामन्यांमध्ये भारताच्या संघाने पाकिस्तानला पराभूत करून सलामी विजय मिळवला आणि दुसऱ्या सामन्यामध्ये दमदार फलंदाजी करून सामना एक हाती केला आहे.
भारतीय संघाच्या फलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर, भारताच्या संघाचे सलामीवीर फलंदाज शेफाली वर्मा आणि स्मृती मानधना फार चांगली कामगिरी करू शकले नाही. शेफाली वर्माने १८ चेंडूंमध्ये ३७ धावा करून संघासाठी महत्वाची खेळी खेळली. तर स्मृती मानधनाने आज तिचा विकेट लवकर गमावला आहे. जेमिमाह रॉड्रिक्स आणि हेमलता या दोघीनी धावांमध्ये फार मोठी कमाल करू शकले नाही. त्यानंतर भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि रिचा घोष या जोडीने कमाल करून दाखवली.
कर्णधार हरमनप्रीत कौरने ४७ चेंडूंमध्ये ६६ धावा करून भारताच्या संघाला विजयाच्या दिशेने नेले आहे. कॅप्टन हरमनप्रीत कौरला साथ देत रिचा घोषने फक्त २९ चेंडूंमध्ये ६४ धावा केल्या आहेत.
भारताच्या संघाने पहिल्या इनिंगमध्ये २०१ धावा करत पाच विकेट गमावले आहेत. युएईची गोलंदाज समायरा धरणीधरका हिने एक विकेट्स घेतला. तर कविशा इगोदगे हिने संघाला दोन विकेट्स मिळवून दिले. हीना होतचंदानी हिने देखील संघासाठी एक विकेट घेतला आहे.