हेनिल पटेल(फोटो-सोशल मीडिया)
Dale Steyn is Henil Patel’s favorite bowler : आयसीसी १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धा सुरू झाली आहे, या स्पर्धेतील पहिला सामना अमेरिका आणि भात यांच्यात खेळला गेला. या पहिल्या सामन्यात पाच विकेट्स घेऊन अमेरिकेविरुद्ध भारताच्या सहा विकेट्सने विजयात महत्त्वाची भूमिका बजावणारा वेगवान गोलंदाज हेनिल पटेल म्हणाला की, तो दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी डेल स्टेनच्या मैदानावरील आक्रमकतेपासून प्रेरणा घेतो. गुरुवारी येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात पटेलने १६ धावांत पाच विकेट्स घेतल्या, ज्यामुळे पाच वेळा चॅम्पियन भारताला त्यांच्या मोहिमेची जोरदार सुरुवात झाली.
पुरुषांच्या १९ वर्षांखालील विश्वचषकात भारतीय गोलंदाजाची ही तिसरी सर्वोत्तम कामगिरी आहे. फक्त कमल पासी (२०१२ मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध २३ धावांत सहा विकेट्स) आणि अनुकुल रॉय (२०१८ मध्ये पापुआ न्यू गिनीविरुद्ध १४ धावांत पाच विकेट्स) यांच्याकडेच चांगली कामगिरी आहे. पटेलने आयसीसी डिजिटलला सांगितले की, “मला डेल स्टेनची आक्रमकता खूप आवडते. त्याचीगोलंदाजी इतकी चांगली होती की कोणताही फलंदाज त्याच्याविरुद्ध मोकळेपणाने खेळू शकत नव्हता. त्याला तोंड देणे खूप कठीण होते. पटेलने त्याच्या सुरुवातीच्या स्पेलमध्ये पाचपैकी तीन बळी घेतले. १८ वर्षीय या खेळाडूने उघड केले की गोलंदाजीची सुरुवात करताना त्याच्या यशाची गुरुकिल्ली विकेटला लक्ष्य करणे होते. मी नेहमीच फलंदाजाला तीन ते चार चेंडूत बाद करण्याचा विचार करतो. माझे ध्येय लवकर विकेट घेणे आहे.
हेही वाचा : Virat Kohli आणि Anushka Sharma यांनी अलिबागमध्ये खरेदी केली कोट्यवधींची जमीन!
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या अमेरिका संघाने ३५.२ षटकांत फक्त १०७ धावाच केल्या. संघाकडून नितीश सुदिनीने ५२ चेंडूत ४ चौकारांसह सर्वाधिक ३६ धावा केल्या. संघाकडून आदिनाथ झांबनेही १८ धावांचे योगदान दिले. तर भारताकडुन हेनिल पटेलने सर्वाधिक पाच बळी घेतले. पावसामुळे प्रभावित झालेल्या सामन्यात भारतासमोर ३७ षटकांत ९६ धावांचे लक्ष्य देण्यात आले. भारताने हे लक्ष्य १७.२ षटकांत पूर्ण केले. भारताकडून अभिज्ञान कुंडूने ४१ चेंडूत नाबाद ४२ धावा केल्या, तर कर्णधार आयुष म्हात्रेने १९ धावांचे योगदान दिले. तर विहान मल्होत्राने १८ धावा केल्या, तसेच कनिष्क चौहान हा १० धावांवर नाबाद राहिला. या सामन्यात वैभव सूर्यवंशीला आपली छाप पाडता अल्लि नाही.






