फोटो सौजन्य - सोशल मिडिया
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेचा शेवटचा सामना 18 जानेवारी रोजी खेळवला जाणार आहे. हा सामना रविवारी होणार आहे त्याआधी भारताचा स्टार विराट कोहली उज्जेनला जाऊन देवाचे दर्शन घेऊन आला. आता त्याच्याबद्दल एक अपडेट समोर आली आहे. भारतीय क्रिकेट दिग्गज विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांनी महाराष्ट्रातील अलिबागमध्ये जमीन खरेदी केली आहे. या जोडप्याकडे आधीच अलिबागमध्ये एक आलिशान बंगला आहे आणि आता त्यांनी पुन्हा एकदा अलिबागमध्ये जमिनीत गुंतवणूक केली आहे.
दोघांकडेही आधीच अनेक आलिशान मालमत्ता आहेत. मुंबई व्यतिरिक्त, विराट कोहलीचा गुडगावमध्ये एक आलिशान बंगला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, यावेळी विराटने आवास बीचजवळील झिरद गावात जमीन खरेदी केली आहे. या जमिनीची किंमत ₹३७.८६ कोटी असल्याचे सांगितले जाते. त्याव्यतिरिक्त, स्टॅम्प ड्युटी ₹२.२७ कोटी आणि नोंदणी शुल्क ₹३०,००० आहे. हा भूखंड १४,७४० चौरस मीटर असल्याचे सांगितले जाते.
विराट आणि अनुष्का यांनी अलिबागमध्ये जमिनीत गुंतवणूक केली असेल, पण ते लंडनला स्थलांतरित झाले आहेत. ते बहुतेक वेळा तिथेच राहतात. कोहली फक्त क्रिकेट खेळण्यासाठी किंवा वैयक्तिक व्यवसायासाठी भारतात येतो, अन्यथा तो त्याचा बहुतेक वेळ लंडनमध्ये त्याच्या कुटुंबासह घालवतो. त्याची आई आणि भाऊ विकास कोहली त्यांच्या गुरुग्राममधील घरी राहतात.
२०२२ मध्ये, कोहली आणि अनुष्काने अलिबागमध्ये आठ एकर जमीन खरेदी केली, ज्याची किंमत त्यावेळी ₹१९.२४ कोटी होती. त्यांनी या जमिनीवर एक आलिशान बंगला बांधला आहे आणि जेव्हा त्यांना वेळ मिळेल तेव्हा ते तिथे भेट देतात.
विराट कोहली सध्या न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत टीम इंडियासोबत खेळत आहे. या मालिकेतील तिसरा एकदिवसीय सामना रविवारी इंदूरमध्ये खेळला जाणार आहे आणि हा सामना जिंकणारा संघ मालिका जिंकेल. वडोदरा येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात कोहलीने ९३ धावांची शानदार खेळी केली. राजकोट येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात तो अपयशी ठरला. कोहली आता फक्त एकदिवसीय स्वरूपात खेळतो. गेल्या सहा सामन्यांमध्ये कोहलीने पाच सामन्यांमध्ये ५० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत, ज्यात दोन शतकांचा समावेश आहे.






