फोटो सौजन्य - सोशल मीडिया
आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी २०२५ चे वाद हे सुरूच आहे. आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी पाकिस्तनामध्ये होणार की नाही? भारत पाकिस्तानात स्पर्धेसाठी जाणार की नाही?भारत पाकिस्तानमध्ये गेला नाही तर टीम इंडियाच्या जागेवर कोणता देश आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी खेळणार असे अनेक प्रश्न क्रिकेट प्रेमींना आहेत. यासंदर्भात बीसीसीआयने भारतीय क्रिकेट खेळाडूंच्या सुरक्षेमुळे भारताचा संघ पाकिस्तानमध्ये जाणार नाही हे स्पष्ट झाले आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 बाबत सातत्याने अहवाल येत आहेत. दरम्यान, आंतरराष्ट्रीय क्रिकेट बोर्ड म्हणजेच ICC ने जाहीर केले आहे की चॅम्पियन्स ट्रॉफी जानेवारी महिन्यात भारतामध्ये येणार आहे. याचा होस्टिंगशी काहीही संबंध नाही, उलट असे होईल कारण मोठ्या स्पर्धांपूर्वी आयसीसी ट्रॉफी टूरचे आयोजन केले जाते. या अंतर्गत आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानातून भारतात येणार आहे. याची अधिकृत घोषणा आयसीसीने केली आहे.
आयसीसीने एका मीडिया रिलीझमध्ये म्हटले आहे की चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या ट्रॉफीचा दौरा 16 नोव्हेंबरपासून सुरू झाला आहे, जो 26 जानेवारी 2025 पर्यंत आयसीसी ट्रॉफी टूर सुरु असणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी शेवटची भारतात येणार आहे. 16 ते 25 नोव्हेंबर या कालावधीत ट्रॉफीचा दौरा पाकिस्तानातील विविध शहरांमध्ये होणार आहे, तर दुसऱ्या दिवशी ट्रॉफी अफगाणिस्तानात पोहोचेल. ट्रॉफीचा दौरा अफगाणिस्तानमध्ये 26 ते 28 नोव्हेंबर दरम्यान होईल आणि त्यानंतर 10 ते 13 डिसेंबर दरम्यान ट्रॉफी बांगलादेशमध्ये असणार आहे. त्याचबरोबर चॅम्पियन्स ट्रॉफीचा दौरा दक्षिण आफ्रिकेत १५ ते २२ डिसेंबर दरम्यान होणार आहे.
क्रीडा संबंधित बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा
दक्षिण आफ्रिकेनंतर, चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ट्रॉफीचा दौरा ऑस्ट्रेलियामध्ये होणार आहे, जिथे 25 डिसेंबर ते 5 जानेवारी दरम्यान ट्रॉफी देशातील विविध शहरांना भेट देईल. त्याच वेळी, ट्रॉफी 6 जानेवारी ते 11 जानेवारीपर्यंत न्यूझीलंडमध्ये राहील आणि त्यानंतर 12 ते 14 जानेवारीपर्यंत ट्रॉफी इंग्लंडला जाईल. यानंतर भारताची पाळी येईल. चॅम्पियन्स ट्रॉफी 15 ते 26 जानेवारी दरम्यान भारतात होणार आहे. त्यानंतर ही ट्रॉफी पाकिस्तानला जाणार आहे.
27 जानेवारी रोजी पाकिस्तानमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यानंतर स्पर्धेची उर्वरित तयारी सुरू होईल. ही स्पर्धा फेब्रुवारी-मार्चमध्ये खेळवली जाणार आहे. मात्र, आतापर्यंत समोर आलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तानला ही स्पर्धा हायब्रीड मॉडेलवर आयोजित करावी लागणार आहे. भारताचे तीन साखळी सामने, एक उपांत्य आणि अंतिम सामना दुबईत खेळला जाऊ शकतो. त्यामुळे भारताचे सामने दुबई, श्रीलंका या देशामध्ये खेळवले जाऊ शकतात.
यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, अभिमन्यू इसवरन, विराट कोहली, ऋषभ पंत, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा/वॉशिंग्टन सुंदर, नितीश रेड्डी, जसप्रीत बुमराह, आकाश दीप, मोहम्मद सिराज.