फोटो सौजन्य - सोशल मीडिया
सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका जागतिक क्रिकेटमध्ये चर्चेचा विषय आहे. टीम इंडिया गेल्या दोन वेळा ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकत आहे. मात्र, यावेळी कांगारू बदला घेण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात मालिका विजयाची हॅट्ट्रिक साधायची असेल, तर त्यात चार बदल करावे लागणार आहेत असा अंदाज वर्तवला जात आहे. यासाठी भारतीय खेळाडू सध्या कसून मैदानात सराव करत आहेत. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये पाच सामान्यांची मालिका होणार आहे या मालिकेचा पहिल्या सामन्याची सुरुवात २२ नोव्हेंबर पासून होणार आहे. भारताच्या संघामध्ये बीसीसीआयए १८ खेळाडूंची निवड केली आहे. यामध्ये बरेच वृत्त समोर आले आहेत यामध्ये टीम इंडियाला मोठे धक्के आणि नुकसान भरपाई करावी लागू शकते.
भारताचा संघाचा कर्णधार रोहित शर्मा वैयक्तिक कारणांमुळे तो पहिल्या सामन्यांमध्ये खेळणार नाही अशी माहिती समोर आली आहे परंतु यासंदर्भात अजुनपर्यत कोणतीही अधिकृत माहिती बीसीसीआयने दिलेली नाही. तर काही खेळाडूंना सरावादरम्यान अनेक भारताचे मुख्य खेळाडू जखमी झाल्याचे वृत्त येत आहेत. यामध्ये सरफराज खान, शुभमन गिल आणि केएल राहुल या खेळाडूंचा समावेश आहे. भारतीय संघामध्ये अनेक नव्या खेळाडूंना संधी मिळू शकते.
क्रीडा संबंधित बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा
अभिमन्यू ईश्वरनच्या जागी साई सुदर्शन ऑस्ट्रेलिया अ संघाविरुद्ध कमालीची कामगिरी केली होती परंतु त्याला बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये स्थान मिळाले नाही. त्याच्या जागेवर निवड समितीने भारताचा युवा खेळाडू अभिमन्यू इसवरन हा राखीव सलामीवीर फलंदाज म्हणून असणार आहे. अभिमन्यू ईश्वरन देखील भारत अ संघाकडून ऑस्ट्रेलिया अ विरुद्ध खेळला होता. पण त्याला विशेष काही करता आले नव्हते पण जर त्याला संघामध्ये स्थान मिळाले तर तो कशाप्रकारे कामगिरी करेल यावर क्रिकेट चाहत्यांच्या नजरा असणार आहेत.
भारताचा अनुभवी फलंदाज मोहम्मद शामी मागील एक वर्षांपासून भारतीय संघाचा भाग नाही. विश्वचषकानंतर झालेल्या सर्जरीनंतर तो बऱ्याच काळ विश्रांती करत होता. भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आता पूर्णपणे तंदुरुस्त आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्येही त्याने दमदार पुनरागमन केले आहे आणि आता तो भारतीय संघामध्ये पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. मोहम्मद शामीने क्रिकेटमध्ये ३६० दिवसांनी मैदानावर परतला आहे आणि त्याने त्याच्या पहिल्याच सामन्यात ७ विकेट्स नावावर केले आहेत. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये विजय मिळवण्यासाठी मोहम्मद शामीला संघामध्ये परत आणावे लागेल.
कर्णधार रोहित शर्मा 22 नोव्हेंबरपासून पर्थमध्ये होणारा पहिला कसोटी सामना खेळणार नसल्याचे वृत्त आहे. मात्र, 15 नोव्हेंबरलाच रोहित दुसऱ्यांदा वडील झाला. अशा परिस्थितीत तो 18 नोव्हेंबरला ऑस्ट्रेलियाला रवाना होऊ शकतो.